Home | International | Pakistan | al quida now targets child for terriost

कार्टून मूव्ही दाखवून अलकायदा लहान मुलांना बनविणार दहशतवादी

वृत्तसंस्था | Update - Jul 22, 2011, 12:16 PM IST

धर्माच्या नावाखाली अडकवून अलकायदा या दहशतवादी संघटनेने आतापर्यंत अशिक्षित लोकांना फूस लावून दहशतवादी बनवले. त्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा निरागस असणाऱया लहान मुलांकडे वळविला आहे.

  • al quida now targets child for terriost

    लंडन- धर्माच्या नावाखाली अडकवून अलकायदा या दहशतवादी संघटनेने आतापर्यंत अशिक्षित लोकांना फूस लावून दहशतवादी बनवले. त्यानंतर त्यांनी आता आपला मोर्चा निरागस असणाऱया लहान मुलांकडे वळविला आहे. अल कायदा संघटनेशी संलग्न असलेली एक संघटना कार्टून मूव्ही बनविण्याचा प्रयोग करत आहे ज्यामुळे ही मुले दहशतवादी बनून लढण्यासाठी तयार होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना दहशतवादात खेचण्यासाठी 'डिस्ने' सारखे चित्रपट बनवून दहशतवादाच्या जाळ्यात खेचायचे.
    नुकतेच याबाबत येमेन मधील एका वेबसाइटवर अशा चित्रपटांची छायाचित्रे टाकली आहेत. यात एक दहा-बारा वर्षाचा मुलगा लढाईच्या गणवेशात दिसत आहे. तो हत्या करताना व दहशतवाद वाढवताना दिसत आहे. लहान मुलांना दहशतवादाकडे वळविण्याची ही एक नवीन पध्दत असल्याचे सांगण्यात येत आहे. असे चित्रपट बनविण्याची घोषणा अरबी भाषेतील एका वेबसाइटवर करण्यात आली. अबू-अल-लैथ-अल-येमेन या संघटनेने हे चित्रपट बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचा खुलासा लंडनमधील क्यूलियम या संघटनेने केला आहे. या संघटनेची स्थापना पूर्वीच्या जिहादी गटाच्या लोकांनी केली होती. क्यूलियमच्या म्हणण्यानुसार, अबू-अल-लैथ व अल कायदा हे एकत्र काम करीत आहे.
    येमेनमधील अलकायदा प्रमुख मारला
    येमेनमध्ये अफगाणिस्ताननंतर सर्वात मोठे अलकायदाचे जाळे आहे. लादेन यांचे अनेक जवळचे सहकारी येमेनमधीन अलकायदा संघटना चालवत होते, आहेत. मात्र लादेन मारल्यानंतर तेथील संघटनेतही संघर्ष उफाळून आला आहे. दरम्यान, तेथील अलकायदा संघटनेचा प्रमुख नेता व मोरक्या अल-शबवानी सैनिकांच्या हल्ल्यात ठार मारला गेला आहे. अलकायदा संघटना तेथील शासनकर्ते अब्दुल्ला सलेह यांच्या विरोधात गेल्या चार महिन्यापासून मोठा संघर्ष करत होती. आता सलेहच्या सैनिकांनी शबवानीला मारल्यामुळे व लादेनचाही अमेरिकेने खात्मा केल्याने अलकायदा मेटाकुटीला येण्याची शक्यता आहे.

Trending