आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1951: ...आणि आइन्स्टाइन हसला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी आयुष्यभर विविध संशोधने केली. त्यामुळेच ते प्रसिद्ध झाले. जिभेने वाकुल्या दाखवणा-या आइन्स्टाइनचे हे छायाचित्र युनायटेड प्रेस इंटरनॅशनलचे छायाचित्रकार आर्थर सेज यांनी 14 मार्च 1951 रोजी टिपले होते. या दिवशी आइन्स्टाइनचा 72 वा वाढदिवस होता.
आर्थरने त्यांना हसवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आइन्स्टाइनने चेह-यावर असे भाव आणले. आइन्स्टाइनला हे छायाचित्र इतके आवडले की, त्यांनी युनायटेड प्रेस कडून याच्या 100 प्रती मागवून घेतल्या. एका छायाचित्रावर स्वत:ची स्वाक्षरी करून एका वार्ताहरास भेट दिले. 2009 मध्ये एका लिलावात हे छायाचित्र 46 लाखांस विक ले गेले.