आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alert Out For Indian Born Jihadi Fighting In Iraq

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS च्या दहशतवाद्यांमध्ये एक भारतीय! विमानतळ, बंदरांवर अलर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इराकमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांमध्ये एका भारतीयाचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतातर्फे या 38 वर्षीय जेहादी दहशतवाद्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या दहशतवाद्याने भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून, विमानतळांबरोबरच बंदरांवर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. केंद्र सरकारांनी नौसेना आणि वायुसेनेलाही अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ISIS ला मदद?
आयएसआयएस च्या दहशतवाद्यांबरोबर असणा-या हा व्यक्तीची हाजी फकरुद्दीन उस्मान अली असल्याचे समोर आले आहे. हा व्यक्ती तामिळनाडूमध्ये जन्मलेला असून, सिंगापूरमधअये राहत असल्याचे सांगितले जाते. उस्मानवर सिरियाच्या युद्धातही आयएसआयएसची मदत केल्याचा आरोप आहे. इराकच्या विरोधातील लढाईत भारतीय संबंध असल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. मात्र उस्मानच्या विरोधात भारतात एकही प्रकरण दाखल नसल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. तसेच त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करणेही शक्य नाही.

सिंगापूरमधून माहिती मिळाली
जानेवारी महिन्यात सिंगापूरच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनंतर उस्मानवर नजर ठेवण्यात येत आहे. या माहितीनुसार उस्मान सुपरस्टोर व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याने सर्वप्रथम 2007 मध्ये जेहादी कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. 2013 मध्ये तो प्रथम सिरियाला गेला असे सांगितले जाते. सिरियाला जाण्यापूर्वी काही वर्षे त्याने सिंगापूरचे नागरिकत्व घेतले होते, असे सांगितले जाते.
अलीला दहशतवादी बनवण्यामागे तामिळनाडूच्या गुल मोहम्मद मारेकर नावाच्या आणखी एका व्यक्तीचा हात असल्याचे सांगितले जाते. गुल मोहम्मद कुड्डालोरचा रहिवासी असून तो अजूनही उस्मानच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. गुल मोहम्मद जानेवारीमध्ये सीरियातून तुर्कीच्या मार्गे जेहादमध्ये सहभागी झाला होता.
फाइल फोटो : दहशतवाद्याच्या मृतदेहाजवळ आनंद साजरा करणारे इराकी सैन्य
पुढे वाचा, इराकमध्ये भारताच्या लष्करी कारवाईची शक्यता