आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्जेरियात ३० बंदिवानांसह ४१ ठार, १०० बंदीवानांना सोडवल्याचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्जेरिया - अल्जेरियामध्ये दहशतवाद्यांच्या तावडीतून बंदिवानांना सोडवण्याच्या प्रयत्नात ३० जणांना प्राणांना मुकावे लागले आहे. अल्जेरिया शासनाने अधिकृतरित्या अजून हे वृत्त दिलेले नाही. अल्जेरिया लष्कराने केलेल्या एका हल्ल्यात ११ अपहरणकर्ते ठार झाले आहेत. रॉयटर वृत्तसंस्थेनुसार १०० बंधकांना सोडवण्यात यश आले आहे.

माली येथील फ्रांसच्या कारवाईविरोधात दक्षिण अल्जेरियामध्ये अल-कायदाशी संबंधीत एका दहशतवादी संघटनेने एका गॅस प्लान्ट शेजारी परदेशी कर्मचा-यांच्या एका गटाला ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांच्या ताब्यातील बहुतेक परदेशी कर्मचारी हे अमेरिका, नॉर्वे आणि ब्रिटन येथील आहेत. गुरुवारी गॅस प्लान्ट जवळ हेलिकॉप्टर मधून झालेल्या गोळीबारात एक डझन दहशतवादी ठार झाले.


दहशतवाद्यांच्या संपर्कात असलेल्या एएनआय वृत्तसंस्थेनुसार, दहशतवादी बंदीवानांना दुस-या ठिकाणी घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असतानी लष्कराने त्यांच्यावर हल्ला केला. एएनआयला पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे की, लष्कराने पुन्हा असा हल्ला केला तर, जेवढे बंदिवान आता ताब्यात आहेत त्या सर्वांना ठार केले जाईल.

दशकातील सर्वात मोठ्या या अपहरण प्रकरणाने अनेक देशांच्या सरकाराने आपातकालीन बैठका बोलवल्या आहेत. अल्जेरियाच्या कारवाई आधी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लिऑन पेनेटा म्हणाले होते की, अमेरिका बंदिवानांना सोडवण्यासाठी योग्य ते सर्व उपाय योजेल.