आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्जेरीयामध्ये विमान दुर्घटनेत 77 जण मृत्यूमुखी, पहिल्यांदाच समोर आले आहेत फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफ्रिकेतील अल्जेरियातील पूर्व भागात लष्करी विमान कोळल्याने 77 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या विमानातून सैन्यातील अधिकारी आणि त्यांचे कुटूंबीय प्रवास करीत होते. गेल्या दहा वर्षातील ही सर्वात मोठी विमान दूर्घटना असल्याचे सांगितले जात आहे.
विमान दूर्घटनेची कारणे शोधण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या विमानात चार वैमानिकांसह 78 लोक असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
खराब हवामानामुळे पर्वताशी टक्कर झाल्याने विमान कोसळल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले आहे. या विमानातील केवळ एक प्रवासी जिंवत असल्याचे सांगितले जात आहे. विमान पर्वताला धडकल्यानंतर एक मोठा स्फोट झाला, त्यामुळे मृतांची ओळख पटणे शक्य होत नाही.
हॅर्क्यूलस सी 130 हे मालवाहू विमान तमानारासेटकडून कान्सटेनटाइन शहराकडे जात असताना खराब हवामानामुळे ही दूर्घटना घडल्याचे अल्जेरियाचे सेना अधिकारी कर्नल लेहमादी बाउगुरेन यांनी सांगितले. हे विमान अल्जेरियाच्या राजधानीपासून 500 किलो मीटर अंतरावरील ओम अल बुआगी प्रांतातील माउंट फोर्टस पर्वताला धडकले आहे. या विमानात 103 जणांचा मृत्यू झाल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. बचाव पथक दूर्घटनाग्रस्त विमानाजवळ पोहचले असून बचावकार्य सुरू झाले आहे.
या आपघातात एक सैनिक वाचला आहे. मात्र तोही गंभीर जखमी आहे. त्याला अल्जेरियाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या सैनिकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. तो बेशुद्ध असून त्यांची ओळख पटत नसल्याचे इंटलिजेंसच्या एका निवृत्त अधिका-याने सांगितले आहे.
या विमान दूर्घटनेनंतर अल्जेरियाचे राष्ट्रपती अब्दुलअजीज बूटाफ्लिका यांनी बुधवारपासून दोन दिवस देशात राष्ट्रीय दुखवटा जाहिर केला आहे. विमान कोसळलेल्या भागात गेल्या कित्येक दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू असून जोराचा वारा वाहत आहे. सेना आणि पोलिस दल बचावकार्यत व्यस्त असून, बचावकार्य जोमाने सुरू आहे
पुढील स्लाइडवर पाहा दूर्घटनाग्रस्त विमानाचे काही फोटो....