अल्जिअर्स - इस्लामिक स्टेटशी संबंधीत जुंद अल-खलिफा या दहशतवादी संघटनेने अल्जेरियामध्ये एका फ्रेंच नागरिकाची हत्या केली आहे. बुधवारी त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करण्यात आला आहे. यात दहशतवादी एका व्यक्तीचा शिरच्छेद करताना दिसत आहेत. दहशतवाद्यांनी म्हटले आहे, की
इराकवर फ्रान्स हवाई हल्ला करत आहे, त्याचा बदला म्हणून त्यांच्या नागरिकाची हत्या करण्यात आली आहे.
रविवारी अल्जेरियाच्या नॅशनल पार्कमध्ये गिर्यारोहण करणार्या एका ग्रुपला दहशतवाद्यांनी पकडले होते. त्यातील 55 वर्षीय हेर्वे गॉर्डेल याला ताब्यात ठेवून दहशतवाद्यांनी इतरांना सोडून दिले होते.
दहशतवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवून असलेल्या अमेरिकेच्या साइट इंटेलिजन्स ग्रुपला गुरुवारी हा व्हिडिओ मिळाला. याआधी आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी अमेरिकेचा पत्रकार आणि ब्रिटीश नागरिकाची ज्या प्रमाणे हत्या केली होती, तीच पद्धत येथे अवलंबल्याचे दिसून आले. या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याऐवजी फ्रांन्सच्या राष्ट्रपतींचा उल्लेख करण्यात आला. फ्रान्सने आयएसआयएसच्या विरोधातील अमेरिकेच्या कारवाईला साथ देत गेल्या शुक्रवारपासून
इराकवर हवाई हल्ले सुरु केले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा हत्येची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाइडवर व्हिडोओ...(छायाचित्र विचलित करणारी असू शकतात)