आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्‍वीवर आढळले परग्रहावरील सूक्ष्‍मजीवांचे वास्‍तव्‍य, शास्‍त्रज्ञांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- पृथ्‍वीशिवाय आणखी कुठे जीवसृष्‍टी आहे का, याचा शोध शास्‍त्रज्ञ अनेक वर्षांपासून घेत आहे. जीवसृष्‍टीच्‍या शोधासाठी मंगळावर मोहिम राबविण्‍यात आली. परंतु, पृथ्‍वीवरच परग्रहावरील जीव वास्‍तव्‍य करुन राहत असल्‍याचा दावा काही शास्‍त्रज्ञांनी केला आहे. हे अतिशय सूक्ष्‍म जीव असून पृथ्‍वीवर सातत्‍याने येत आहेत. त्‍यांचा उगम पृथ्‍वीवर नाही, असे या शास्‍त्रज्ञांचे म्‍हणणे आहे.

शेफिल्‍ड विद्यापीठातील शास्‍त्रज्ञांच्‍या एका चमूने काही प्रयोग केल्‍यानंतर हा निष्‍कर्ष काढला आहे. अंतराळात 27 किलोमीटरपर्यंत एक विशेष फुगा सोडण्‍यात आला. नुकताच या भागात मोठा उल्‍कापात झाला होता. त्‍यादरम्‍यान हा प्रयोग करण्‍यात आला. शास्‍त्रज्ञांना या फुग्‍यावर असंख्‍य सूक्ष्‍मजीव आढळले. हे जीव पृथ्‍वीवरचे नसल्‍याचे शास्‍त्रज्ञांचे म्‍हणणे आहे.