आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Airline Companies Stopped All Flight\'s From Peshawar

Peshawar : पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या मृत्यूदंडावरील बंदी उठवली, शरीफ सरकारचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - आर्मी स्कूलमधील ऑडिटोरियमध्ये मुलांचे रक्त असे सांडले
पेशावर/इस्लामाबाद/वॉशिंग्टन - पेशावर हल्ल्यानंतर दुस-याच दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दहशतवादी प्रकरणांत मृत्यूदंडावर लावलेली बंदी हटवली आहे. सरकारी प्रवक्ते मोहिनुद्दीन वानी म्हणाले की, पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळ समितीने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यापेक्षी अधिक दुःखद काहीही असू शकत नाही, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारने दहशतवाद्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश आले नाही असेही शरीफ म्हणाले. दहशतवाद्यांच्या विरोधात कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

दरम्यान, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ बुधवारी काबूलमध्ये गेले आहेत. काबूलमधील अफगाण मिलिट्रीसोबत चर्चा करुन दहशतवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करता येईल का, याचा धोंडोळा ते घाणार आहेत.

भारतीय संसदेत प्रस्ताव
बुधवार पेशावर हल्ल्याच्या विरोधात संसदेत एक प्रस्ताव मंजुर करण्यात आला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये हल्ल्याची तीव्र निंदा करण्यात आली. दहशतवादाविरोधातील लढाईत पाकिस्तानबरोबर असल्याचे स्वराज म्हणाल्या. त्यानंतर संसदेत दोन मिनिटे स्तब्ध राहून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दरम्यान, पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या हल्ल्यानंतरच्या तपासात या शाळेत एक जिवंत बॉम्ब आढळून आला आहे. बॉम्ब नाशक पथकाने नंतर हा बॉम्ब निकामी केला असून, शाळेची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यातील मृतांचा आकडा 145 वर पोहोचला आहे.
शेवटच्या स्लाईडवर पाहा, शाळेमधील ऑडिटोरिअमचा VIDEO

दरम्यान, हल्ल्यानंतर सर्वच आंतरराष्ट्रीय विमानसेवा कंपन्यांनी पेशावर विमानतळावरून सुरू असलेली वाहतूक थांबवली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानची सरकारी विमानसेवा कंपनी पीआयएच्या परदेशी क्रू मेंबर्सनीही पेशावरमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. यूएईनेही आपले विमान पेशावरला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला करत 132 मुले आणि शाळेच्या मुख्यध्यापिकेसह नऊ कर्मचा-यांची हत्या केली. या घटनेनंतर पाकिस्तानात सर्वत्र दुःखाचे वातावरण आणि सरकारच्या विरोधात रागाची भावाना व्यक्त करण्यात येत आहे.

आशा ठेऊ नका, येथे काहीही बदलणार नाही
पाकिस्तानच्या कबायली प्रांतात चांगले राजकीय वजन असणारे आफताब अहमद खान शेरपाओ म्हणाले की, ही देशासाठी लज्जास्पद आणि दुःखद घटना आहे. पण या घटनेनंतर आपल्या देशात काही बदलेले असे जर तुम्हाला वाटत असेल तर तशा आशा बाळगू नका. धर्म, राजकारण आणि लष्कर यामधील अनेक लोक आजही दहशतवाद्यांना मिळालेले आहेत. त्यांच्या संवेदना दहशतवाद्यांबरोबर आहे आणि पुढील काळातही राहील. सध्या जरी ते घटनेचा निषेध करत असले तरी, पुन्हा त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल. त्यामुळे चांगल्या भविष्याची अपेक्षा करू नका.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही हृदय पिळवटून टाकणा-या प्रतिक्रिया...
अखेरच्या स्लाइडवर पाहा शाळेतील ऑडिटोरियमचा VIDEO...