आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजंगलात वाघ दिसला तरी तुमचे, आमचे हातपाय लटपटतात; पण ब्राझीलच्या मरिंगा शहरातील पत्नी, तीन मुली असे पाच जणांचे अॅरी बोर्गेस यांचे कुटुंब विरळाच. त्यांच्या कुटुंबात माणसांसोबतच वाघ, सिंहही आहेत. एरवी जंगलात दिसणारे हे प्राणी बोर्गेस यांच्या अंगणात गुण्यागोविंदाने राहतात.
टायगर फॅमिली : सन 2005 मध्ये डॅन व टॉम या दोन वाघांना सर्कशीतून सोडवून आणले होते. शिवाय आणखी सात वाघ, दोन सिंहिणी, दोन माकडे, एक छोटेसे कुत्र्याचे पिलू असा हा परिवार आहे.
काय आहे वैशिष्ट्य : बोर्गेस यांच्या तीन मुली उयारा (23), नायरा (20) आणि देयुसानिरा (24) या वाघांसोबत खेळतात. हाताने मटण भरवतात. हे वाघही अगदी त्यांच्या किचनपर्यंत येतात. अॅरी यांची दोन वर्षांची नात वाघाच्या पाठीवर बसून फेरीही मारते.
अॅरी यांच्या छंदास वाइल्ड लाइफचा विरोध
कुटुंबाच्या या भयंकर छंदास ब्राझीलच्या इबामा या पर्यावरण संरक्षण व प्राणिमित्र संघनटनेने विरोध केला आहे. या प्राण्यांची नसबंदी करून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. संघटनेने त्यांचा प्राण्यांचा परवानाही रद्द केला आहे. हे प्रकरण आता ब्राझीलच्या फेडरल कोर्टासमोर आहे; पण अॅरी बोर्गेस म्हणतात, अनेक संग्रहालयांमध्ये वन्यप्राण्यांकडे कुणी लक्षही देत नाही. आमच्याकडे प्राण्यांच्या डॉक्टरांची चांगली टीम आहे. आम्ही त्यांचा चांगला सांभाळ करतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.