आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लायबेरिया विद्यापीठात सर्वच विद्यार्थी प्रवेश परीक्षेत नापास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायबेरिया आफ्रिकेतील सर्वात जुने युरोपियन नसलेले उच्च शिक्षणासाठीचे विद्यापीठ आहे. या वर्षी या विद्यापीठात प्रवेशासाठी घेतलेल्या परीक्षेत एकही जण उत्तीर्ण झाला नाही. 25 डॉलर्स खर्च करून 25 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. आपण स्वत: या निकालांमुळे हैराण झालो आहोत, अशी प्रतिक्रिया लायबेरियाचे शिक्षणमंत्री अँटमोनिया डेव्हिड टारपेह यांनी दिली आहे. याप्रकरणी ते विद्यापीठातील संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. नुकतेच शाळेतून बाहेर पडलेल्या या विद्यार्थ्यांना इग्रजीचे प्राथमिक ज्ञान नसल्यामुळे ते इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमकुवत आहेत. लायबेरियात पात्र शिक्षकांचीही कमतरता आहे. 1 mirror.co.uk