आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All World Leaders Come In Saudi Arebia For Condolance Demise Of Abdullha

अब्दुल्ला यांच्या निधनामुळे जागतिक नेते सौदी अरेबियात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - सौदी अरेबियाचे किंग अब्दुल्ला यांच्या निधनामुळे जगभरातील नेतेमंडळी नवनिर्वाचित राजा सलमान यांचे सांत्वन करण्यासाठी सौदीत पोहोचली आहे. यात ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, प्रिन्स चार्ल्स, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद आदी नेते सौदीला आलेले आहेत. अमेरिकेचे उपराष्ट्रपती ज्यो बिडेन हेसुद्धा सौदीला येणार होते. मात्र, ते आता काही दिवसांनंतर येतील. सौदीतील सुधारणांचे जनक म्हणून अब्दुल्ला यांची ओळख असून त्यांनी महिलांना मतदानाचे अधिकार मिळवून दिले होते. न्यूमोनियाच्या आजारामुळे शुक्रवारी त्यांचे निधन झाले.