आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Altra Light Hovitzar Tank News In Marathi, Divya Marathi, America

तोफांचा सौदा थंडबस्त्यातच, भारतीय लष्कराला पाहावी लागणार वाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अल्ट्रा लाइट होवित्झर तोफा बनवण्याचा खर्च अमेरिकेने वाढवल्यामुळे भारताने सुमारे 145 तोफा घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मागील 25 वर्षांपासून नव्या तोफांच्या प्रतिक्षेत असलेल्या भारतीय लष्कराला अजूनही यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
25 वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने बोफोर्स तोफा खरेदी केल्या होत्या. या तोफा बनवण्याचा खर्च वाढवल्यामुळे भारतीय अधिका-यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री चक हेगल यांच्याकडे त्यांच्या भारतीय दौ-यादरम्यान चिंता व्यक्त केली होती. एम 777 होवित्झर तोफांसाठीचा हा सौदा 2013 दरम्यान सुमारे 3600 कोटी रुपयांत ठरला होता. मात्र, या व्यवहाराला अंतिम रुप देण्यास उशीर लागला. त्यामुळे कंपनीने ऑगस्ट 2013 मध्ये यात 300 कोटींची वाढ केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, होवित्झर कंपनीने तोफांची निर्मिती बंद केली आहे. ती सुरू करण्यासाठी त्यांनी भारताकडून संपूर्ण खर्च मागितला आहे. मात्र, व्यवहाराची बातचीत सुरू असतानाच खर्च वाढवणे चुकीचे असल्याचे भारताकडून सांगण्यात आले आहे.

चीन-पाक सीमेवर आवश्यक
बोफोर्स घोटाळा उघडकीस आल्यानंतर भारताने मागील 25 वर्षांपासून तोफांची खरेदी केली नाही. अमेरिका तयार करणा-या होवित्झर तोफा लष्कराला चीन आणि पाकिस्तानच्या डोंगराळ सीमारेषेवर तैनात करायच्या आहेत. होवित्झरसोबतचा व्यवहार फिसकटण्याची चिन्हे दिसताच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना तसेच आयुध फॅक्टरी बोर्डाने स्वदेशी तोफांची निर्मिती करण्याची तयारी सुरू केली आहे.