आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amanda Loy 4ft Tall Body Builder Walks Away From Her First Ever Competition

भेटा जगातील सर्वांत बुटक्‍या महिला शरीरसौष्‍ठवपटूला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरिजोना( अमेरिका)- 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' अशा आशयाची आपल्‍याकडे एक म्‍हण आहे. या म्‍हणीचा प्रत्‍यय अमेरिकेमध्‍ये आला आहे. 22 वर्षीय अमांडा लॉय या महिलेची उंची फक्‍त चार फुट आहे. मात्र या महिलेची स्‍वप्‍न फार मोठी आहेत. शरीरसौष्‍ठव स्‍पर्धेत तिने किताब जिंकून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला आहे.
अमांडाचे वजन फक्‍त 72 पौंड आहे. जन्‍माताच ती हिपोकॉन्‍डोप्‍लायसिया नावाच्‍या आजाराने ग्रस्‍त होती. परंतु या आजारावर विजय मिळवत तिने कित्‍येक महिन्‍यांच्‍या कठीण परीश्रमानंतर एरिजोनाच्‍या मेसा मध्‍ये झालेल्‍या 'एनपीसी वेस्‍टर्न युएसए फिगर' स्‍पर्धेत केवळ भागच घेतला नाही तर वाहवासुध्‍दा मिळविली.

अमांडाला स्‍टेजवर पाहताच प्रेक्षकांनी तिला प्रोत्‍साहन दिले. अमांडा स्‍कॉटलँमधील एक नर्सिंग कोर्सची विद्यार्थ्‍यीनी आहे. शरीरसौष्‍ठव स्‍पर्धेत भाग घेणारी अमांडा ही जगातील सर्वांत बुटकी महिला ठरली आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, अमांडाची छायाचित्रे...