आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुर्ज खलिफा ते वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत; जाणून घ्या जगभरातील इंजिनिअरिंगच्या 7 अद्भूत कलाकृतींबद्दल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दुबईची गगनचुंबी इमारत बुर्ज खलीफा)
आंतरराष्ट्रीय डेस्क - जगाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खुप मोठी प्रगती केली आहे. यामध्ये अत्याधुनिक मशनरीपासुन गगनचुंबी इमारती आणि लांबच लांब पुलांची निर्मितीसुध्दा केली आहे. Divyamarathi.com आज तुम्हाला असाच काही इंजिनिअरींगच्या अद्भूत अशा 7 कलाकृतींबद्दल सांगणार आहे. या सात कलाकृती जगभरातील इंजिनिअरिंगमधील अद्वीतीय कलाकृती मानल्या जातात... चला तर मग पाहूयात कोणकोणत्या कलाकृती आहेत या....
सिव्हील इंजिनिअरींग आणि एरोडायनामिक्स
बुर्ज खलीफा, दुबई:
बुर्ज खलीफा ही एक गगनचुंबी इमारत आहे. दुबईमध्ये असलेली ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीची उंची 2,722 फुट (829.8 मी) एवढी आहे. या इमारतीच्या निर्माणास 21 सप्टेंबर 2004 सुरूवात झाली. या इमारतीचे बाहेरील बांधकाम 1 ऑक्टोबर 2009 पर्यंत पूर्ण झाले होते. त्यानंतर 4 जानेवारी 2010 ला ही इमारत पर्यटकांसाठी उघडण्यात आली. या इमारतीच्या निर्मितीचे काम स्किडमोर, ओविंग्स आणि मॅरिल (शिकागो) च्या देखरेखीत झाले. बिल बेकर (चीफ सिव्हिल इंजीनियर) या निर्माण कार्याचे मुख्य सहाय्यक होते. ही इमारत बनवण्यासाठी जवळपास 1 अब्ज 50 कोटी डॉलर (सुमारे 900 कोटी रुपये) खर्च आला.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या इतर 6 इंजिनिअरिंग कलाकृतीबद्दल