तुम्ही अनेक प्रकारच्या मशीन पाहिल्या असतील. म्हणजेच एकीकडून बटाटे टाकले की दुसरीकडून चिप्स तयार, अथवा एकीकडून पिठाचे गोळे ठेवले की दुसरीकडून चपाती तयार... अशा अनेक मशिन बाजारात उपलब्ध आहेत. मात्र जर तुम्हाला असे सांगितले की, एकीकडून फक्त विटा अथवा पेवर ब्लॉक (गट्टू) टाका आणि दुसरीकडून रस्ता तयार! काय अशक्य वाटतयं ना? हो मात्र हे खरं आहे.
टायगर स्टोन या कंपनीने एक अशीच मशीन तयार केली आहे. स्टोन पेवींग मशीन नावाच्या यामशिनीमुळे 400 यार्ड (365 मीटर) रस्ता केवळ एका दिवसात बनते. म्हणून या मशिनीला 'रोड प्रिंटर' असेही संबोधले जाते. विशेष म्हणजे हा रस्ता हाताने बनवायचा असेल तर अनेक लोकांचे परिश्रम तर लागतातच मात्र एवढे अंतर एका दिवसात कापणे शक्य होत नाही. या मशिनच्या साह्याने केवळ 4-5 लोकांच्या मदतीने तुम्ही हा रस्ता अगदी आरामात बनवू शकतात.
टायगर स्टोनची ही मशिन पूर्णपणे वीजेवर चालते. या मशीनीमध्ये अनेक छोट-छोटे पार्ट लावण्यात आले आहे. त्यामुळे या मशीनीचा आवाजही फार कमी येतो. या मशिनमध्ये लावण्यात आलेल्या सेंसरमुळे ही मशीन रस्ता सोडत नाही. तसेच एका ठरवलेल्या आऊटलाईनमध्येच ही मशीन काम करते. कंपनीकडून ही मशीन विविध आकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 13, 16 आणि 20 फुट अशा आकारांत ही मशिन मिळते. तर या मशिनची किंमत $81,485 (49,27,805 रु.) ते $108,655 (65,70,911 रु) एवढी आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या मशीनीचे फोटो आणि शेवटच्या स्लाईवर व्हिडीओ...