ऑकलंड - आताच्या युगात झाडांचे काम फक्त सावली आणि फळ देण्याचे राहिलेले नाही. कारण जगातील काही कल्पना बहाद्दरांनी झाडावर अनोखेच प्रयोग केले आहे. त्यांनी चक्क झाडांवर रेस्तरॉं उभारले आहेत. ती तुम्हाला न्युझीलंड, थायलंड आणि जपान या देशांमध्ये पाहावयास मिळतील. त्यांच्या आकारामुळे ती लोकांमध्ये खूपच लोकप्रिय होत आहेत. जगभरातील अनेक रेस्तरॉं आपल्या खास अशा वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. जसे की काही रेस्तरॉं पाण्याच्या आत आहेत, तर काही ठिकाणी वेटरचे काम वानर करताना दिसतील. तुम्हाला येथे दिसत असलेले आहे ट्री हाऊस रेस्तरॉंचे.
न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये 2008 साली ट्री हाऊस रेस्तरॉं रेडवूड झाडावर तयार करण्यात आले. नंतर अशा प्रकारची रेस्तरॉं जगातील अनेक भागात बनवण्यात आली आहे. यांच्या लोकप्रियतेमुळे येथे गर्दी मोठ्याप्रमाणावर वाढली असून ग्राहकाला अॅडव्हान्स बुकिंग करावी लागते. झाडांवर बनवण्यात आलेल्या या रेस्तरॉंमध्ये जेवण शिडीने, तर काही ठिकाणी रोपवेने ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा विविध देशातील ट्री हाऊस रेस्तरॉ.....