आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालंडन - कागदी पुस्तकांचा जमाना गेला आहे, असे किमान इंग्लंडपुरते तरी आता म्हणता येऊ शकेल. कारण साहेबांच्या देशात ई-बुक्सची मागणी प्रचंड आहे.
व्हर्च्युअल बुकच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. इंटरनेट वाचक उपकरणांच्या साहाय्याने पुस्तकांना डाऊनलोड करू लागले आहेत. त्यामुळे पारंपरिक पुस्तके पिछाडीवर पडू लागल्याचे ‘डेली मेल’च्या वृत्तात म्हटले आहे.
अॅमेझॉन या ऑनलाइन रिटेलर कंपनीने आपल्या कामाला ऑगस्ट 2010 मध्ये सुरुवात केली. त्यांच्यामार्फत या वर्षी 100 पुस्तकांचे वितरण केले जाते. कंपनीकडे 114 पुस्तके उपलब्ध आहेत. ई-रीडर उपकरणांच्या माध्यमातून ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकांची विक्री होत आहे. विशेष म्हणजे पुस्तकांची किंमत अमेरिकेपेक्षा सत्तर टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून येते. विक्रीचा असा विक्रम आम्ही अगोदर अमेरिकेतदेखील केला होता. कंपनीने किंडल सेवा सुरू करून साडेतीन वर्षे झाली आहेत. ब्रिटनमध्ये या सेवेला दोन वर्षे झाली आहेत, अशी माहिती किंडल योजनेचे उपाध्यक्ष जॉरिट वान डार मेउलेन यांनी दिली. योजनेच्या यशानंतर आम्ही जास्तीत जास्त पुस्तकांची विक्री करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
ई-बुक्सची लोकप्रियता लेखक व प्रकाशकांच्याही पथ्यावर पडली आहे. अनेक इच्छुक लेखकांना आपले पुस्तक ऑनलाइन प्रकाशित करणे शक्य होऊ लागले आहे. वाचकांशी थेट संपर्क साधण्यासाठी या साधनाचा उपयोग होतो. शिवाय विक्रीतून पैसाही मिळवता येऊ शकतो. अॅमेझॉनने यंदा ब्रिटिश लेखक ई. एल. जेम्स यांचे वादग्रस्त पुस्तक फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे उपलब्ध करून दिले आहे. त्याची विक्री जोरात सुरू आहे.
पुस्तकांची दालने बंद - ई-बुक्सचा फंडा वाचकांना अधिक सोयीचा वाटू लागल्यामुळे खरेदी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून मोठ्या बाजारपेठेतील पुस्तकांची दुकाने हळूहळू बंद होत असल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.