आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अॅमेझोनच्या आदिवासींनी हटके अंदाजात केले फुटबॉल वर्ल्डकपचे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मनोसमध्ये फुटबॉल खेळताना आदिवासी) - Divya Marathi
(मनोसमध्ये फुटबॉल खेळताना आदिवासी)
मनोस - ब्राझीलमध्‍ये सध्‍या फीफा फुटबॉल वर्ल्डकपचा फीव्हर दररोज वाढतोय. अ‍ॅमेझॉनच्या आदिवासींनीही वर्ल्ड कपचे वेगळ्या ढंगात स्वागत केले आहे. अ‍ॅमेझॉनच्या मनोसमध्‍ये खेळण्‍यात आलेल्या वर्ल्डकप सामन्यादरम्यान फुटबॉल चाहत्यांनी आपला मोर्चा इतरही भागांमध्ये वळवला. येथे एका वेगळ्याच अंदाजात फुटबॉल खेळताना पाहावयास मिळाला. या दरम्यान अ‍ादिवासी मुले फुटबॉल खेळताना दिसले.
मनोस शहर हे जगातील सर्वाधिक पाऊस पडणा-या प्रदेशाच्या मधोमध वसले आहे. जिथे फक्त विमान किंवा जहाजाने पोहोचता येते. असे असतानाही मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक येथे येतात. या पर्यटकांची भेट अ‍ॅमेझॉनमधील टाटुओ आदिवासी जमातीशी झाली. ही जमात शहराच्या पश्चिमेपासून काही मैलावर असलेल्या जंगलात राहते.
अ‍ॅमेझॉनच्या आदिवासींनी आपल्या हातांनी तयार केलेल्या पारंपरिक वस्तू भेट म्हणून दिल्या. सामन्यत: हे आदिवासी दिवसभरातून 10 ते 30 पर्यटकांचे स्वागत करतात. परंतु वर्ल्डकपच्या दरम्यान ही संख्‍या 250 वर पोहोचली आहे. असे तीन आठवड्यापर्यंत चालेल. टाटुओ आदिवासींनी पर्यटकांना प‍ारंपरिक रस आणि माशांचा स्वाद दिला.

पुढील स्लाइड्सवर पाहा अ‍ॅमेझॉन मध्‍ये झालेल्या फुटबॉल आणि चाहत्यांचे स्वागत.....