हे छायाचित्र आहे 120 वर्षांपूर्वीचे. त्यात गगणचुंबी इमारती आणि आधुनिकता कुठेच दिसत नाही. हे छायाचित्र अमेरिकेचे आहे,असे सांगितले तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र हे वास्तव आहे. 120 वर्षापूर्वी अमेरिकेचा विकास झालेला नव्हता. पुरातन अमेरिका कसे दिसत होते. हे पाहाण्यासाठी 'अमेरिका ओडिसी' हे पुस्तक पाहावे लागते. या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आलेली पुरातन छायाचित्रे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
अमेरिकेचे पुरातन छायाचित्रे संकलीत करून ' अमेरिका ओडिसी' नावाचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये अमेरिकेतील मुळनिवासी, आफ्रिका, अमेरिकन यांची काळानुरूप बदलत गेलेल्या छायाचित्रांची मांडणी कली आहे. पुस्तकामध्ये 1888 ते 1924 या काळातील अमेरिकेची छायाचित्रे संकलीत करण्यात आली आहेत. देशातील शहर, नैंसर्गीक सौंदर्य या पुस्तकामध्ये पाहायाला मिळतात. छायाचित्रांना पोस्ट कार्डच्या स्वरूपात मांडण्यात आले आहे.
संकलीत केलेली सर्व छायाचित्रे ब्लॅक अॅण्ड व्हाईट कलरमध्ये होती. नंतर या छायाचित्रांवर प्रक्रिया करून त्यांना रंगीत बनवण्यात आले आहे. अमेरिकेचे नावाजलेले फोटोग्राफर मार्क वॉल्टर यांनी या छायाचित्राचे संकलन केले आहे.
पुढील स्लाईडवर पाहा शतकापूर्वीच्या अमेरिकेची छायाचित्रे...