आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानात अमेरिकेसमोरील अखेरचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी 22 महिन्यांमध्ये 66 हजार अमेरिकी सैनिकांना अफगाणिस्तानातून माघारी बोलावणे अत्यंत सोपे आहे. परंतु वास्तवात हे असे आहे का? मागील 12 वर्षांत अमेरिकेने अफगान युद्धासाठी ज्या लष्करी सामानाची जुळवाजुळव केली, त्याला परत घेऊन जाणे हीच मोठी अडचण आहे. हे किती कठीण आहे, याचा अंदाज एका उदाहरणावरून लावता येईल.

जुलै 2012 मध्ये कर्नल एंड्र्यू रोहलिंग आपल्या शस्त्रधारी सैनिकांसोबत फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस शॅँकवर पोहोचले, जो अफगाणिस्तानातील अमेरिकेचा तिसरा सर्वात मोठा लष्करी तळ मानला जातो. येथे पोहोचताच त्यांना आठ हजार शिपिंग कंटेनर्सचा साठा पाहावयास मिळाला. यात जुनाट झालेली शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्य होते. रोहलिंग आणि त्यांचे पथक सहा महिन्यांत तीन हजार कंटेनर्सला अमेरिकेत पाठवू शकले. परंतु यादरम्यान हजारो आणखी कंटेनर्स जमा झाले.

अमेरिकेने युद्धासाठी मोठ्या प्रमाणावर विमाने, शस्त्रास्त्र यंत्रणा, संगणक आदी जमवले होते. याशिवाय केबल्स, रिपेअर पार्ट्स, निर्माणाचे साहित्य आणि जंकही दहा हजारांवर कंटेनर्समध्ये भरले गेले. 50 हजारांवर सैन्य वाहनांचा यात समावेश आहे.

या सर्व वस्तूंना परत घेऊन जाण्याचा खर्च अंदाजे 32 कोटी रुपयांवर आहे. परंतु केवळ खर्च ही एकमेव समस्या नाही. यातील मुख्य अडचण म्हणजे युद्धाचा अधिकांश भाग अफगाणिस्तानातील सुदूर भागावर केंद्रित होता आणि गरजेच्या सार्‍या वस्तू तेथेच पोहोचवल्या जात. बडगाववरून सरासरी दर दीड मिनिटामध्ये एक विमान आकाशात झेपावते आणि रोज जवळपास 1300 सैनिक तसेच 600 टन कार्गो अफगाणिस्तानची सीमा ओलांडतात. परंतु अफगाणिस्तानचा दुर्गम भूगोल, पराभव न स्वीकारण्याच्या जिद्दीवर अडलेला शत्रू आणि हेकेखोर अधिकारी इथे अमेरिकेचे अखेरचे मिशन पूर्ण होण्यात मोठा अडसर आहेत.