आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Alert His People For Probably Terrorist Attack

अमेरिकी नागरिकांना अलर्ट, बँका, हॉटेल्स अतिरेक्यांच्या निशाण्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुराबाया - एअरएशिया विमानाच्या दुर्घटनेमुळे चर्चेत अालेल्या इंडोनेशियात सध्या अमेरिकेने आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. देशातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या सुराबायामधील अमेरिकेशी संबंधित बँका आणि हॉटेल्स अतिरेक्यांच्या निशाण्यावर असल्याचे गुप्तचर खात्याने म्हटले आहे.
अमेरिकेच्या राजदूत कार्यालयाने शनिवारी हा अलर्ट जारी केला; परंतु अतिरेकी देशातील बँका, हॉटेल्सना लक्ष्य करण्याची भीती व्यक्त होत असताना इंडोनेशियाच्या पोलिसांना मात्र त्याची काहीही कल्पना नाही. विभागाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल ऑगस रियांटो यांनी दहशतवादाचा धोका असल्याची आम्हाला काहीच कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेकडून ही माहिती देण्यात आल्यानंतर सुराबाया शहरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. इंडोनेशियात सातत्याने इस्लामी दहशतवादी गटाकडून हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अमेरिकी नागरिकांना अशा ठिकाणी जाण्याचे टाळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या दूतावासाने दिलेला इशारा महत्त्वाचा मानला जातो. दुसरीकडे आठवड्यापूर्वी जावा सागरात एअर एशियाचे प्रवासी विमान कोसळले होते. सुराबायापासून काही अंतरावर हे सागरी क्षेत्र आहे. त्या घटनेत १६२ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे इंडोनेशिया चर्चेत आले होते.

एअर एशियाच्या शोधमाेहिमेची महत्त्वाची माहिती घेण्यासाठी सुराबाया पोलिस मुख्यालयात जाणारे मृतांचे नातेवाईक. इंजिनातील बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी अवशेष शोधण्याच्या कामात खराब वातावरणाचा अडथळा आला.

जोडून पाहू नका
फ्लाइट८५०१ च्या बचाव मोहिमेत आमचा सहभाग असला तरी हल्ल्याशी याचा काही संबंध नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टींना जोडून पाहू नका, असे अमेरिकी राजदूत कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी रविवारी स्पष्ट केले.

‘एअर एशिया’शी हल्ल्याचा संबंध ?
हल्ल्याचासंबंध एअर एशियाशी जोडण्यात येऊ लागला आहे. अमेरिकेच्या नौदलाने दुर्घटनेतील अवशेष आणि मृतदेहांना शोधण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला आहे. त्याचा सूड म्हणून दहशतवादी गट अमेरिकेच्या विरोधात पुन्हा सक्रिय झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातो.

कृती शत्रुत्वातून
सेऊलअमेरिकेनेसोनी पिक्चर्सवरील सायबर हल्ला प्रकरणात उत्तर कोरियाला शनिवारी चांगलाच दणका देण्याचा प्रयत्न केला. अगोदरच आर्थिक निर्बंध असलेल्या उत्तर कोरियावर निर्बंधांचा आणखी भार वाढवण्यात आला. त्यावर उत्तर कोरियाने रविवारी ‘शत्रुत्वातून कृती’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर अमेरिकेने आपला गर्विष्ठपणा अद्यापही सोडलेला दिसत नाही