आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • America And Its Alliance Nations Destroyed IS Oil Field, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयएसच्या तेलसाठ्यांवर अमेरिकी मित्रराष्ट्रांचे हल्ले, २० ठार, तर डझनावर संशयितांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत - अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या फौजांनी गुरुवारी आयएस या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात असलेल्या सिरियातील तेल साठ्यांवर हवाई हल्ले केले. त्यात किमान २० जण ठार झाले आहेत. अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे.

इस्लामिक स्टेटची रसद तोडण्यासाठी तेल साठ्यांवर ही कारवाई केली. मायदीन भागातील चार तेल साठे आणि तीन तेल विहिरी यांच्यावर बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी हवाई हल्ले करण्यात आले. घटनेत १४ दहशवादी ठार झाले. अन्य मृत पाच जण तेल प्रकल्पाच्या परिसरात राहणारे होते. त्यातून या दहशतवादी संघटनेला आर्थिक फटका बसेल व त्याचा परिणाम त्यांच्या दहशतवादी कारवायांवर होईल, असे अमेरिकेला वाटते. आयएसने याच वर्षी सुरुवातीला सिरियातील तेलाचे मोठे प्रकल्प आपल्या ताब्यात घेतले होते. तेलाच्या तस्करीतून संघटनेसाठी पैसा उभारण्यात येत असल्याचा संशय होता. हे तेल काळ्या बाजारात विकले जात होते, असे अमेरिकेला वाटते.

गेल्या आठवड्यापासून कारवाई
अमेरिका आणि सौदी अरेबिया, यूएई, जॉर्डन, बहारिन आणि कतार या मित्रराष्ट्रांनी सिरियामध्ये आयएस संघटनेविरोधात हवाई हल्ले सुरू केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सुमारे दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकन सैन्यास आयएसविरोधात मोठी मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते.

रक्तरंजित संघर्ष
सिरिया व वायव्य इराकमध्ये या दहशतवादी संघटनेचा मोठा प्रभाव असून या संघर्षात आतापर्यंत हजारो ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी दोन अमेरिकन पत्रकारांचा निर्घृण शिरच्छेदही केला आहे.