हवामान खराब असताना एक फोटोग्राफर आणि अॅनिमेटर एका लहान बाळासोबत एका ठिकाणी अडकून पडले तर तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा कराल, मात्र अमेरिकेतील कारेन अबेडने चक्क त्या बाळाला प्रसिद्ध टिव्ही स्टार्सचे रूप दिले आणि त्याचे फोटोसेशन केले. तिने बेबी मॉडेल ओलोवियासोबत असाच एक प्रोजेक्ट तयार केला आहे. तिने या फोटो सेशनला 'ओलिविया फेवरेट टिव्ही शोज' हे नाव दिले आहे.
अबेड सांगते, की ती जेव्हा हिवाळ्यात तिच्या मित्राच्या घरी भारतात आली होती तेव्हा तिने ओलिवियाची आई क्रिस्टियाला तिच्या आवडीच्या टिव्ही स्टार्ससारखे तयार करण्यास सांगितले. त्यानंतर त्या दोघींनी ओलोवियाला गर्ल्सची हन्ना होवार्थ, ब्रेकिंग बॅडचावॉल्टर व्हाइट आणि गेम ऑफ थ्रेम्सच्या डेनरी टारगेरेयनसारख्या अनेक कलाकारांचे रूप दिले.
प्रत्येक पात्रानूसार ओलोवियांच्या चेह-यावरील भाव टिपणे सर्वात अवघड काम असल्याचे अबेड सांगते. आलोविया एक हसरी मुलगी आहे आणि तिला पात्रानूसार हसू न देणे हे सर्वात कठीण होते, असे अबेड म्हणते.
हे फोटो सोशल नेटवर्किंग साइटसवर अनेक लोकांनी लाइक आणि शेअर केले आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा विविध टिव्ही स्टार्सच्या रूपातील बेबी मॉडेल ओलोवियाचे अनोखे रूप.