आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकारीसाठी गेला आणि स्वत:च फसला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या कोलोरॅडो शहरातील कोलोरॅडो नदीत एक शिकारी स्वत:च फसला.मंगळवारी दुपारी एक वाजेची ही घटना आहे. झाले असे की, शिकारीने एका बदकाला गोळी मारली. बदक बर्फाच्या नदीत पडले. शिकारीने प्रथम आपल्या कुत्र्याला बदक आणण्यासाठी पाठवले.कुत्रा हे बदक आणू शकला नाही. मग शिकारी स्वत:च गेला. बदकाजवळ पोहोचताच नदीवरील बर्फ खचला. शिकारी नदीत पडला. बर्फाच्या थंडगार पाण्यात सुमारे पाऊण तास तो अडकून पडला होता.

कुत्र्याने आपल्या मालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे प्रयन्त व्यर्थ ठरले. अखेर नदीच्या दूसर्‍या किनार्‍यावर असलेल्या वाटसरूंनी इर्मजन्सी सेवेला कळवले त्यानंतर शिका-याला बाहेर काढण्यात आले.