आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Decides To Close North Virginia University

अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठ बंदचा निर्णय, भारतीय विद्यार्थ्यांवर संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या उच्च शिक्षण विभागाने उत्तर व्हर्जिनिया विद्यापीठ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने होणार असल्याने तेथे शिक्षण घेणार्‍या दोन हजार विद्यार्थ्यांवर संकट कोसळले आहे. पैकी बहुतांश विद्यार्थी भारतातील आहेत.

व्हर्जिनिया प्रांताच्या स्टेट कौन्सिल फॉर हायर एज्युकेशनने 16 जुलैला हे विद्यापीठ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. भारतामध्ये ‘अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय विद्यापीठ’ अशी जाहिरात करणार्‍या या संस्थेला त्वरित कामकाज बंद करावे लागणार असल्याचे या आदेशात म्हटले होते. ज्या विद्यार्थ्यांकडे एफ-1 व्हिसा असेल त्यांनी संरक्षण विभागाकडे इमिग्रेशन आणि आॅप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी संपर्क साधावा, असे कौन्सिलने सूचित केले आहे. बंद विद्यापीठाला त्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि आर्थिक माहिती देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.


बंद करण्याची कारणे
०सुमारे 15 वर्षांपासून मान्यता नसतानाही हे विद्यापीठ सुरू होते.
०गेल्या पाच वर्षांपासून या ठिकाणी आवश्यक प्राध्यापक नव्हते.
०नॉर्थ व्हर्जिनियाबद्दल माहिती असणार्‍यांनाही याबाबत माहिती नव्हते.

गर्विष्ठ संस्थापक, कुलगुरू सेक्स रॅकेटमध्ये
या विद्यापीठाचे संस्थापक डॅनियल यांनी एका मुलाखतीदरम्यान पत्रकारांना सांगितले होते की, ‘संस्था खूप नफ्यात आहे. मी पदवी, पदविका विकू शकतो. पण मी तसे करणार नाही. मला विचारणारा कोण आहे? मी स्वत:च.’ आधी एक कुलगुरू हे विद्यापीठ चालवत होते. त्यांना एफबीआय, इमिग्रेशन व कस्टम विभागाने जुलै 2011 मध्ये सेक्स रॅकेट चालवत असल्याप्रकरणी अटक केली होती.