आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी महिलांच्या वाट्याला संगणकशास्त्राच्या केवळ 12% पदव्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत संगणकशास्त्रांच्या तज्ज्ञांची उणीव भासू लागली आहे. 2020 पर्यंत देशात 14 लाख संगणक तज्ज्ञांची गरज असेल, परंतु अमेरिकेतील विद्यापीठे त्यातील एकतृतीयांश प्रशिक्षित पदवीधरदेखील पुरवू शकणार नाहीत. संगणक उद्योगांची नजर अर्ध्या लोकसंख्येवर आहे. तसे सध्या संगणकशास्त्राच्या केवळ बारा टक्के पदव्या महिलांकडे आहेत. या स्थितीत बदल आणण्यासाठी मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या पुढे आल्या आहेत. गुगल, फेसबुक आणि एटी अँड टी यांसारख्या कंपन्या मुलींसाठी कोडिंग क्लास चालवत आहेत.

एक स्वयंसेवी संस्था ‘गर्ल्स हू कोड’ने टेक इंडस्ट्रीसोबत मुलींसाठी सात आठवड्यांसाठी कोर्स चालवण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. संस्थेच्या संस्थापिका रेश्मा सौजानी सांगतात, अधिकाधिक मुलींना संगणक प्रशिक्षण देणे आमचे लक्ष्य आहे. 2012मध्ये हा कार्यक्रम 20 मुलींपासून सुरू झाला होता. आता देशभरातील तीन हजार याशी जोडल्या गेल्या आहेत. या महिला संगणक माहीतगार टेक कंपन्यांसाठी अनेक प्रकारे उपयोगी सिद्ध होतील. इंटरनेटवर खरेदी महिलाच जास्त करतात. त्यामुळे व्यवसाय यशासाठी त्यांची भागीदारी महत्त्वाची.
गुगल एक्सचे उपाध्यक्ष मेगन स्मिथ म्हणतात, आपण आपल्या मुलींना कोडिंग शिकवले नाही तर आपण जगाच्या तुलनेत मागे राहून जाऊ. गुगलच्या अभियंत्यांमध्ये केवळ 17 टक्के महिला आहेत. कंपनीने मुलींसाठी मेड विथ कोड साइट सुरू केली आहे. त्यात मोफत प्रोग्रामिंग प्रोजेक्ट आहे. त्याने गर्ल्स हू कोड प्रोग्रामसाठी पाच कोटी डॉलर दिले आहेत. परंतु समस्येवर फक्त पैशांनी उपाय होऊ शकत नाही. शिक्षणतज्ज्ञांना हवे की, खूपच कमी मुली संगणकशास्त्राशी संबंधित का राहू इच्छितात? त्या इतर विषयांमध्ये तर मुलांपेक्षा पुढे असतात. गर्ल्स हू कोडचा अभ्यासक्रम तयार करणारे अ‍ॅश्ले गेव्हीन म्हणतात, अभियांत्रिकी कोर्स करणार्‍या एखाद्या महिलेचे जर बी प्लसपेक्षा कमी ग्रेड येतात, तर ती कोर्स सोडण्याची शक्यता असते. दुसरीकडे, एखादा मुलगा बी मायनसपेक्षा कमी ग्रेड आल्यावरच अभ्यास अपूर्ण सोडतो.
काही शिक्षणतज्ज्ञ प्रारंभीच्या वर्गांना असे रूप देत आहेत की, मुलींनी कोर्स सोडू नये. गुगल महिला कोडर्सना प्रोत्साहन देत आहे. तरीही, कोडिंगला क्लासरूमशी जोडल्याशिवाय पर्याय नाही. अमेरिकेतील दहापैकी नऊ शाळांमध्ये संगणकशास्त्राचा कोर्स नाहीये. मार्क जकरबर्ग, बिल गेट्स आणि गुगलने मिळून प्रोग्राम सुरू केला आहे. हा प्रोग्राम चीन, व्हिएतनाम, ब्रिटनसारखे प्राथमिक शाळेपासून कोडिंग क्लासची सुविधा देतो. त्यातून संगणकशास्त्रात स्त्री आणि पुरुषांतील अंतर कमी व्हायला मदत होईल.

मुलींसाठी तीन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन
संगणकशास्त्रावर तीन कार्यक्रम मुलींसाठी वर्षभर कोडिंग क्लास उपलब्ध करून देत असतात.code.org या संकेतस्थळावर यासंबंधीची संपूर्ण माहिती मिळू शकते.


टेक्नोव्हेशन - 19 देशांतील मुलींनी तीन महिन्यांच्या संगणक वर्ग आणि अ‍ॅप बनवणार्‍या कार्यक्रमात भाग घेतला.

ब्लॅक गर्ल्स कोड - सात वर्षे आणि त्याहून जास्त वयाच्या मुलींच्या कार्यशाळेचे लक्ष्य कृष्णवर्णीय मुलींना संगणकशास्त्राशी जोडणे आहे.

गर्ल्स हू कोड - या कार्यक्रमात भाग घेणार्‍या तीन हजार मुलींमधून 95 मुली म्हणतात, त्या संगणकशास्त्राचा मुख्य कोर्स करू इच्छितात.