आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने विकसित केला वास्तवदर्शी रोबोट पक्षी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकी लष्कराने रोबोट पक्षी विकसित केला आहे. हा पक्षी हवेतून म्हैस अथवा अन्य प्राण्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे. त्यामुळे भविष्यात रोबोट पक्ष्याकडे युद्ध एजंट म्हणून पाहिले जाते. अमेरिकी लष्कर आणि मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांच्या संयुक्त पथकाने रोबो-रेवन पक्षी विकसित केला आहे. संशोधकांमध्ये भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. रोबो पक्ष्याचा आवाज व उडणे खरोखरच्या पक्ष्याप्रमाणेच आहे. रेवनमध्ये पंखाची गती नियंत्रित करण्याची क्षमता आहे. आतापर्यंतच्या तांत्रिक पक्ष्यांमध्ये ही क्षमता दिसून आली नाही, असे अमेरिकी लष्करी प्रयोगशाळेतील संशोधकांनी सांगितले. सामान्य दृष्टीत हा पक्षी स्वत:चे अस्तित्व लपवू शकतो, असे व्हेइकल टेक्नॉलॉजी ग्राउंड संचालनालयाचे इंजिनिअर जॉन गेर्ड्स यांनी सांगितले. रोबो-रेवनचा आवाज हेलिकॉप्टर किंवा प्रोपलरपेक्षा शांत आहे. डॉ. एस.के. गुप्ता यांचा या संशोधनात महत्त्वपूर्ण वाटा आहे. 2007 मध्ये त्यांनी यशस्वीरीत्या पक्षी विकसित केला होता.