आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • America Developed ; But 99 Percent People Are Poors

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत प्रगती झाली;पण 99 टक्के लोक गरीब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


यूसी बर्कले युनिव्हर्सिटीतील इमॅन्युअल सॅझ या अर्थशास्त्रज्ञांच्या मते,अमेरिकेतील धिमी अर्थव्यवस्था वेगाने विकसित झाल्यामुळे श्रीमंतांना जास्त फायदा झाला. यामुळे अमेरिकेतील एक टक्का श्रीमंत लोक आणखी श्रीमंत झाले आणि उर्वरित 99 टक्के गरीब लोक आणखी गरीब झाले. ‘स्ट्रायकिंग इट रिचर’ नावाच्या अध्ययनात त्यांनी हे मत मांडले आहे. सॅझ यांना आढळून आले की, 2009 मध्ये झालेल्या आर्थिक लाभाचा 121 टक्के भाग श्रीमंतांच्या खात्यात जमा झाला. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास वेगाने आर्थिक विकास झाला तरी यादरम्यान अमेरिकेतील 99 टक्के लोक गरीबच राहिले. यावरून मॅट स्टोलर यांच्या पॅटर्नला दुजोरा मिळतो.

त्यांच्या मते, जॉर्ज बुश यांच्या तुलनेत ओबामांच्या कार्यकाळात देशातील उत्पन्न असमान स्वरूपात वाढले. हे कसे झाले, यासंबंधी सॅझ याच्या अध्ययनात सांगितले आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास श्रीमंतांना होणारा फायदा भांडवली नफ्यातून झाला आहे. या ठिकाणी अद्याप कराचे आकडे स्पष्ट नाहीत, ही बाब लक्षात घ्यायला हवी.
इक्विटी आणि ब्रँड मार्केट विस्तारल्यामुळे अशा प्रकारच्या सर्व खासगी इक्विटी आणि हेझ फंडांच्या व्यावसायिकांना फायदा झाला. या व्यावसायिकांनी भांडवली नफ्यातून संबंधित कर वाचवला. म्हणजेच कर वाचवण्याच्या तरतुदी केल्या, पण त्याच अध्ययनात असाही उल्लेख करण्यात आला आहे की, याखालील दर्जाच्या लोकांवर आर्थिक संकटाच्या काळात वाईट परिणाम झाले. त्यामुळे भांडवली उत्पन्नात मोठी घट झाली. इंटरनेट क्रांतीची तुलना वास्तविक अर्थव्यवस्थेशी फार करता येत नाही, कारण ही क्रांती ‘अर्थ’पूर्ण पद्धतीने केलेल्या उधारीवर आधारित नाही. तसेच 2008-09 सब प्राइमच्या रूपाने आलेल्या हाउसिंगच्या बुडबुड्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान पोहोचवले.