आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासोबतच्या चर्चेत घरकामगारांचा; देवयानी यांच्यावर अ‍ॅनिमेशन चित्रपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन -अमेरिका भारतासोबतच्या द्विपक्षीय चर्चेत घरकामगारांचा मुद्दा समाविष्ट करणार आहे. मोलकरणीच्या व्हिसात खोटी माहिती दिल्याप्रकरणी भारताच्या उपमहावाणिज्यदूत देवयानी खोब्रागडे यांना अटक करण्यात आली होती. यावरून दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. तो दूर करण्यासाठी चर्चा सुरू आहे. अमेरिकी परराष्‍ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता व्यक्त केली असून भविष्यात ती होणे अपेक्षित मानले जाते.
वाद उद्भवल्यानंतर भारताने देवयानी यांना संयुक्त राष्‍ट्रात भारताचे कायम प्रतिनिधी म्हणून बदली केली. तसेच अमेरिकी राजनैतिक अधिका-यांना मिळणा-या विशेष सवलती मागे घेतल्या आहेत. देवयानी यांना व्हिसा अर्जात चुकीची माहिती दिल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यांची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती. देवयानी यांचे वकील डॅनियल अरशाक म्हणाले, चौकशीदरम्यान राजनैतिक सुरक्षा सेवा एजंट मार्क स्मिथ यांनी गंभीर चूक केली. देवयानी यांच्या मोलकरीच्या पगाराचा अंदाज बांधण्यात चूक केली.
देवयानी यांच्यावर अ‍ॅनिमेशन चित्रपट
नवी दिल्ली । भारतीय राजनैतिक देवयानी खोब्रागडे यांच्यावर 90 सेकंदांचा अ‍ॅनिमेशन चित्रपट तयार केला आहे. यामध्ये भारतीय राजनैतिकाला कालीदेवीच्या रूपात दाखवण्यात आले आहे. तैवानची कंपनी नेक्सट मीडिया अ‍ॅनिमेशनने हा चित्रपट तयार केला आहे. या टीव्ही समूहाने चर्चेतील अनेक व्यक्तींवर अ‍ॅनिमेशन चित्रपट बनवला आहे.