आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेमध्ये बेछूट गोळीबारात 7 जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस- अमेरिकेतील सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या गोळीबाराच्या घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. दक्षिण कॅलिफोर्नियातील एका महाविद्यालयात झालेल्या बेछूट गोळीबारात 7 ठार, तर 7 जण जखमी झाले.

इस्लाव्हिस्टा शहरातील शुक्रवारी रात्री घडलेली ही घटना आहे. सांता बार्बरा येथील महाविद्यालयात हा रक्तपात घडला. संशयित हल्लेखोराने काळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यूमधून परिसरात प्रवेश केला आणि बेछूट गोळीबाराला सुरुवात केली. रात्री झालेल्या हल्ल्याची माहिती रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करताना हल्लेखोराला प्रत्युत्तर दिले. त्यात तो ठार झाला. संशयिताच्या कारमधून पोलिसांनी हँडगन जप्त केली आहे. हा हल्ला एका व्यक्तीनेच केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. हल्ल्याची नऊ ठिकाणे आहेत.