आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मक्तेदारी संपुष्टात; अमेरिकेने इंटरनेटवरील आपले नियंत्रण काढून घेतले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- इंटरनेटचे डोमेन नेम, रूट सर्व्हर आणि आयपी अ‍ॅड्रेसवरील अमेरिकेचे नियंत्रण संपुष्टात आल्याची घोषणा अमेरिकेकडून शनिवारी जारी करण्यात आली आहे. हेरगिरीच्या प्रकरणांमुळे अमेरिकेवर जगभरातून दबाव वाढला होता. त्यामुळेच अमेरिकेने इंटरनेटवरील आपले नियंत्रण काढून घेण्याचा निर्णय घेतला.

इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइंड नेस अँड नंबर्स (आयसीएएनएन) ही संस्था जगभरातील संकेतस्थळांना डोमेन नेम अर्थात डॉट कॉम, डॉट नेट, डॉट ओआरजी देण्याचे काम करते. याशिवाय आयपी अ‍ॅड्रेसचे व्यवस्थापनही या संस्थेकडूनच केले जाते. आतापर्यंत या संस्थेवर अमेरिकेचा ताबा होता. आयसीएएनएनचे नियंत्रण अनेक देशांतील एका संस्थेला देण्याची मागणी विविध देशांकडून होत होती. त्यामुळे अमेरिकेला हे नियंत्रण हटवावे लागले. आता संयुक्त राष्ट्रामार्फत यावर नियंत्रण ठेवले जाईल.