आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Issueing Arrest Warant Against Edward Snoden

अमेरिकन हेरगि‍री उजेडात आणणा-या एडवर्ड स्नोडेनविरुद्ध अटक वॉरंट जारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकी हेरगिरीचा भंडाफोड करणा-या एडवर्ड स्नोडेनवर हेरगिरी आणि सरकारी मालमत्तेच्या चोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. तो हाँगकाँगमध्ये असून त्याच्या प्रत्यापर्णासाठीही ओबामा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.


राष्ट्रीय सुरक्षा संस्थेकडून (एनएसए) व्हर्जिनिया न्यायालयात अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सरकारी गोपनीय माहितीची चोरी करणे, त्यासाठी हेरगिरी करणे व ही माहिती बेकायदा इतरत्र देणे, असे आरोप स्नोडेनवर ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर वॉरंटही जारी करण्यात आले आहे. या प्रकरणात 29 वर्षीय स्नोडेनला अगोदरच नोकरी गमवावी लागली आहे. तो बुझ अ‍ॅलन हॅमिल्टन कंपनीत नोकरीला होता. दरम्यान, दस्तऐवज जाहीर झाल्याने गुप्तहेर यंत्रणेचे कामकाज कसे चालते, याची माहिती दहशतवाद्यांना मिळू शकते, असे अमेरिकेने म्हटले आहे.
तीन गंभीर आरोप
01 गुप्तचरांची गोपनीय माहिती जाणूनबूजून फोडणे
02 सरकारी मालमत्तेची चोरी
03 संरक्षणासंबंधित राष्ट्रीय माहितीची अनधिकृतरीत्या देवाणघेवाण


प्रकरण काय?
अमेरिकेसह जगभरातील फोन आणि संगणकावर निगराणी सुरू असल्याचा पर्दाफाश स्नोडेनने केला होता. त्यामुळे तो सरकारच्या दृष्टीने बंडखोर ठरला आहे. स्नोडेन हा पूर्वाश्रमीच्या सीआयशी संबंधित खासगी कंत्राटदाराकडे विश्लेषक म्हणून कार्यरत होता.


हाँगकाँगचे मौन
स्नोडेन अमेरिकेला हवा आहे. त्यासाठी त्याला अटक करण्यात यावी, अशी सूचना अमेरिकेने हाँगकाँग सरकारला केली आहे. हाँगकाँगने मात्र प्रत्यार्पणाच्या मागणीवर कसलीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगले आहे.


स्नोडेनचा आणखी एक गौप्यस्फोट
ब्रिटिश गुप्तचर संस्था ‘जीसीएचक्यू’ ही अमेरिकेच्या एनएसएसोबत हातमिळवणी करुन हेरगिरी करीत असल्याचा सनसनाटी गौप्यस्फोट ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तपत्राने केला आहे. समुद्रात असलेल्या फायबर ऑप्टिक केबलला टॅप करून आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या टेलिफोन व इंटरनेटवरील माहितीवर निगराणी करीत होती. गेल्या दीड वर्षात जीसीएचक्यूने ‘प्रोजेक्ट टेपोरा’नावाने ही हेरगिरी केल्याची माहितीही स्नोडेन यानेच दिली आहे.