आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत अस्थायी कर्मचारी नेमण्याच्या पद्धतीकडे कल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील कित्येक शहरांमध्ये पहाटे 4-5 वाजेच्या दरम्यान रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये लोकांची गर्दी जमलेली असते. हे लोक कित्येक मैल लांब असलेल्या गोदामांमध्ये जाण्यासाठी वाहनांची वाट पाहत असतात. 15 आसनांची क्षमता असलेल्या व्हॅनमध्ये 22 व्यक्तीदेखील बसतात. काही लोक चक्क खाली बसतात. हे मेक्सिको, ग्वाटेमाला किंवा होंडुरास नाही. हे आहे शिकागो, न्यू जर्सी, बोस्टन. हे लोक अमेरिकेच्या वॉलमार्ट, नाइके, पेप्सिको या कंपन्यांच्या फ्रिटो विभागासाठी ट्रक आणि कपाटांमध्ये माल चढवतात. ते या कंपन्यांचे कर्मचारी नाहीत, तर कंत्राटी कामगार म्हणून एखाद्या एजन्सीसाठी काम करतात.

कामगार मंत्रालयाने सांगितले की, अमेरिकेत एवढे (27 लाख)अस्थायी कर्मचारी कधीच नव्हते. मंदी सुरू झाल्यानंतर रोजगाराच्या एक पंचमांश भाग अस्थायी क्षेत्रात तयार झाला आहे. अमेरिकेतील जॉब मार्केटमध्ये अस्थायी संस्थांद्वारे आऊटसोर्सिंगची पाळेमुळे खोलवर जाऊ लागली आहेत. पॅकिंग कामगार, हमाल यातील पाचपैकी एक मजूर आणि ऑटोप्लँटमध्ये अ‍ॅसेम्ब्ली कामाशी निगडित सहापैकी एक टीम अस्थायी आहे. अमेरिकन स्टाफिंग असोसिएशननुसार खासगी क्षेत्रात अस्थायी कर्मचारी दहापट वाढले. दशकभरापासून लोकांच्या उत्पन्नात विषमता वाढली आहे.

कनिष्ठ व मध्यम उत्पन्नवाल्यांचे उत्पन्न स्थिर आहे किंवा त्यात घसरण झाली. अस्थायींचे सरासरी उत्पन्न कायम कर्मचार्‍यांपेक्षा 25 टक्के कमी आहे. कित्येक शहरांत अस्थायी कर्मचार्‍यांची संख्या अशी आहे की, त्यांना टेंपररी टाऊन म्हणू लागले आहे. मिशीगन, न्यू जर्सी मेम्फिस, काउंटी, पेन्सिल्व्हेनियासह कित्येक ठिकाणी अशा वस्त्या आहेत.