आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेने जगातील सर्वात लहान उडता रोबोट तयार केला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेने जगातील सर्वात लहान उडणारे रोबोट तयार केले असून त्याचे वजन एक ग्रॅमपेक्षाही कमी असल्याचे म्हटले जात आहे. या रोबोटला ‘कार्बन फायटर’ असे नाव देण्यात आले आहे. यात अत्याधुनिक तीव्रतेचे स्नायू असल्यामुळे हे रोबोट सहजपणे उडू शकते.
अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हा रोबोट विकसित केला असून त्यास बनवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागली. वैज्ञानिकांच्या चमूच्या प्रमुखाने सांगितले की, हा रोबोट पक्ष्याप्रमाणेच विशिष्टरीत्या पंख हलवतो आणि त्याच्या मदतीने हवेतच आपली दिशाही बदलू शकतो. सेकंदात 120 वेळा पंख फडफडण्याची त्याची क्षमता आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पिजोइलेक्ट्रिकल पदार्थामुळे पंखात वारंवार व्होल्टेज प्रवाहित होतो आणि थांबतो. त्यामुळेच रोबोटचे पंख सामान्य कीटकांप्रमाणेच कार्य करतात. त्यांच्या मते, कीटकांची उडण्याची प्रक्रिया समजण्यासाठी हा रोबोट बनवण्यात आला होता.
आता पर्यावरणावर नजर ठेवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.