Home | International | Other Country | america market support india

अमेरिकन अर्थव्यवस्थेला भारतीय उद्योजकांचे बळ

वृत्तसंस्था | Update - Dec 26, 2011, 04:35 AM IST

आर्थिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा जगभरात दबदबा निर्माण झाला आहे.

 • america market support india

  वॉशिंग्टन - आर्थिक महासत्ता म्हणून अमेरिकेचा जगभरात दबदबा निर्माण झाला आहे. आर्थिक आघाडीवर अमेरिकेची भरभराट झालेली असली तरी त्यात मोठ वाटा भारतीयांचा आहे. अमेरिकेतील 50 पैकी 23 प्रमुख उद्योगांची मुहूर्तमुढ भारतीयांनी रोवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘यूएस नॅशनल फाउंडेशन फॉर अमेरिकन पॉलिसी’ या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे.
  अमेरिकेची अर्थव्यवस्था आज मंदीच्या संकटातून वाटचाल करत आहे. या स्थितीत त्यांना भारतीय उद्योजकांनी काही वर्षांपूर्वी उभ्या केलेल्या उद्योगांचे महत्त्व डोंगराएवढे मोठे वाटत आहे. आजघडीला टॉप 50 म्हणून ओळखल्या जाणा-या अनेक उद्योगांची सुरुवात भारतीयांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यातही बहुतांश उद्योग व उद्योजक गुजराती आहेत. या उद्योगांच्या आधारावरच आज अमेरिकन अर्थव्यवस्था ग्लोबल भरारी घेत आहे. या उद्योगांनी अमेरिकेत हजारो हातांना काम दिले. मंदीच्या विळख्यातून सावरण्यासाठी भविष्यातही अमेरिकेला भारतीय उद्योजकांची गरज पडेल. कारण त्यांनी या अर्थव्यवस्थेला बळ दिले, असे यूएस फाउंडेशनच्या अहवालात स्पष्टपणे मान्य करण्यात आले आहे.
  स्वत:चा रोजगार सुरू करण्यावर भर : अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय व्यक्ती स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यावर भर देतात. अमेरिकन नागरिक तशी रुची दाखवत नाहीत. 2010 मध्ये पर महिन्याला प्रत्येक एक लाख व्यक्तींमागे 620 व्यक्तींनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्या तुलनेत 280 स्थानिक व्यक्तींनीच स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. इतर देशांतील व्यक्तींच्या तुलनेत भारतीयांचे उद्योग तेथे वेगाने वाढत आहेत.
  रोजगारनिर्मितीत यांचे योगदान : वरुण मेहता व उमेश माहेश्वरी (संस्थापक, निंबल स्टोरेज 2008), अजित रोहतगी (संस्थापक सुनीवा इंक, 2007), सतीश पालवी (संस्थापक एग्जेक्टली कॉर्प 2005), आर. के. आनंद, एस. के. विनोद, अशोक कृष्णमूर्ती (एक्सिगो सिस्टम) व अन्य.
  12 टक्के उत्पन्न भारतीयांमुळे - अमेरिकन अर्थव्यवस्थेत तेथे स्थायिक झालेल्या भारतीयांचे योगदान खूप मोठे आहे, असे अमेरिकेचे इमिगे्रेशन अ‍ॅटॉर्नी यांनी मान्य केले आहे. अर्थव्यवस्थेला बळकट रूप देणा-यांत 25 टक्के उद्योजक हे गुजराती असून 12 टक्के उत्पन्न त्यांच्यामुळे प्राप्त होते. अमेरिकेची वार्षिक व्यावसायिक उलाढाल 577 अब्ज डॉलर आहे. भारतीय वंशाच्या व्यक्ती त्यात 11.6 टक्के म्हणजे 67 अब्ज डॉलरचे योगदान देतात.

Trending