आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America May Think Of Visa Application Of Narendra Modi

मोदींनी व्हिसासाठी अर्ज केल्‍यास विचार करु, अमेरिकेची भूमिका; कवाडे किलकिली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी अमेरिकेची कवाडे किलकिली झाली आहेत. मोदींनी व्हिसासाठी अर्ज करावा, त्यावर विचार करू, असे आश्वासन अमेरिकेने गुरुवारी दिले. परंतु पंतप्रधानपदी मोदींची निवड झाली तर काय भूमिका असेल, या प्रश्नाला मात्र परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने बगल दिली.

देशाचा कायदा व नियमांचे ते पालन करतात का, या निकषावर त्यांच्या अर्जाला मान्यता देण्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या जेन साकी म्हणाल्या. मोदींना व्हिसा दिला जाईल का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, यासंबंधी आमचे धोरण बदललेले नाही. मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर अमेरिका काय करेल? या प्रश्नाला त्यांनी टाळले. भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या एका अमेरिकी दौर्‍याविषयी एका पत्रकाराने साकी यांना प्रश्न विचारला होता. सिंह यांनी आपल्या अमेरिकेच्या दौर्‍यात मोदी यांच्यासाठी मोहीम राबवली होती. यूपीएचे सरकार भारतात प्रचंड अप्रिय आहे, याविषयीदेखील एक प्रश्न विचारण्यात आला होता. मोदी आगामी पंतप्रधान असतील, अशादेखील अटकळी आहेत.

आक्षेप काय होता?
अमेरिकेने नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारला होता. 2002 मध्ये गोध्रा दंगलीच्या काळात मानवी हक्काचे उल्लंघन झाले होते. त्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर होते. त्यामुळे त्यांना व्हिसा देण्यास अमेरिकेने नकार दिला होता.