आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकन लोकांमध्ये घटतेय अपत्यप्रेम, महिलांचे लक्ष मुलांऐवजी करिअरकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लारा स्कॉट लेखिका आणि चित्रपट निर्माती आहे. ‘आई बनायचे नाही’ असा निश्चय त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी केला होता. आपल्या आईला दिवसभर नोकरी केल्यानंतर उरलेल्या वेळेत घरकाम करताना ती पाहत होती. वयाच्या 26 व्या वर्षी लाराचे लग्न झाले. मात्र तिचा निश्चय बदलला नाही. लारा सांगते, मी आपल्या पद्धतीने जीवन जगू इच्छिते. त्यामुळेच मी मुलांना जन्म न देण्याचा निश्चय केला आहे. तिचे वय आता पन्नास वर्षे आहे आणि अपत्याविना सुखी आहे.

लारा एकटी नाही. अमेरिकेच्या इतिहासात सध्या जन्मदर सर्वात कमी आहे. 2007 ते 2011 दरम्यान प्रजनन दरात नऊ टक्क्यांनी घट झाली आहे. 2010 च्या प्यू संशोधन अहवालानुसार सर्व जातिसमूहांमध्ये अपत्यहीनतेची स्थिती वाढली आहे. पाचपैकी एक अमेरिकन महिला अपत्य जन्माला घालण्याचे वय ओलांडल्यानंतर अपत्यहीन होत्या. 1970 मध्ये दहापैकी एक महिला या र्शेणीत होत्या. महामंदीचा काळ सुरू होण्यापूर्वी 2008 मध्ये मुलांना जन्म न देणार्‍या 40 ते 44 दरम्यान वयाच्या महिलांचे प्रमाण 80 टक्क्यांपर्यंत पोहोचले. 1976 मध्ये ते 10 ते 18 टक्क्यांच्या आसपास होते. ही आकडेवारी इटालीसारख्या काही युरोपीय देशांच्या तुलनेत कमी आहे.

अमेरिकेत जन्मदरात घट झाली आहे, मात्र मुलांसाठी विविध उत्पादने निर्माण करणारे उद्योग 49 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. अपत्यहीन महिलांना टीकेला तोंड द्यावे लागते. न्यूयॉर्क टाइम्समध्ये आपल्या स्तंभात रॉस डाउदॅट लिहितात, मुलांना जन्म घालण्यापासून परावृत्त होणे र्‍हासाचे संकेत आहेत. हा प्रकार सद्यस्थितीला महत्त्व देण्याच्या भावनेशी निगडीत आहे. जोनाथन लास्ट आपल्या वादग्रस्त पुस्तकात लिहितात, अपत्यहीन अमेरिकन लोकांचा स्वार्थ आपले आर्थिक भविष्य नष्ट होण्यासाठी दोषी असेल.

अपत्यप्राप्तीवरील उपचार सोपे झाल्यामुळे वंध्यत्व असलेल्या महिलांपाशी आई बनण्याचे उपाय पहिल्यापेक्षा अधिक आहेत. लेखिका एमी रिचर्ड्स म्हणते, आई होण्याचे दडपण महिलांमध्ये मी कधीच पाहिले नाही.

अपत्य जन्माला घालण्यासाठी महिलेचे योग्य वय 15 ते 44 वर्षे मानले जाते. पुरुष तर वयाच्या 65 व्या वर्षीदेखील पहिल्यांदा पिता बनू शकतात. मिशीगन विद्यापीठातील लोकसंख्या शिक्षण विभागाच्या पामेला स्मॉक म्हणतात, सांस्कृतिक आणि सामाजिक आधारावर अपत्य न झाल्यास स्त्रीलाच दोषी मानले जाते. एका संशोधकाच्या मते अपत्यहीन स्त्री चतुर असते. लंडन स्कूल ऑक इकॉनॉमिक्सच्या संतोषी कानाजावा यांचा निष्कर्ष आहे की, महिला जेवढी बुद्धिमान असेल तिच्या मातृत्वाची शक्यता तेवढीच कमी असेल. कानाजावा यांना ब्रिटनच्या बालविकास अध्ययनच्या विश्लेषणात आढळले की, उच्च बुद्धिमत्तेचा संबंध अपत्यहीनतेशी आहे. ते अशा निष्कर्षापर्यंत आले की, मुलींमध्ये 15 आयक्यूच्या वृद्धीने त्यांची आई होण्याची शक्यता 25 टक्के घटते. अपत्यहीनतेच्या घटनांमध्ये उच्चशिक्षित श्वेत महिला जास्त आहेत. मात्र 2010 च्या प्यू अभ्यासानुसार इतर समूहांतदेखील असे आढळू लागले आहे. 1994 ते 2008 दरम्यान अपत्यहीन कृष्णवर्णीय महिलांची संख्या 30 टक्के वाढली आहे. अविवाहित एकाकी जीवनसुद्धा यामागे एक कारण आहे. कॅरोलिना लोकसंख्या केंद्राचे संचालक फिलीप मॉर्गन म्हणतात, खूपच थोड्या मुली एकाकी जीवनाची कल्पना करतात. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आर्थिक, व्यावसायिक, सामाजिक, रोमँटिक वास्तवतेच्या संदर्भात आपण बदलू लागतो. त्यांचे म्हणणे आहे की, गेल्या वीस वर्षांत जन्मदर घटण्यामागे या बदलाची भूमिका असू शकते. नौकरी, शिक्षण, अपेक्षित जोडीदार न मिळाल्यामुळे आई न होण्याचा निर्णय घेतात.

अर्थशास्त्रज्ञ ब्रायन केप्लान सांगतात, रोजगारापासून अलिप्त राहणार्‍या अमेरिकन महिलेला पगार, बढतीपोटी 10 लाख डॉलरचे नुकसान सोसावे लागते. आर्थिक संकटाच्या काळात अशा काळजीच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होऊ शकत नाहीत. मात्र न्यूयॉर्क विद्यापीठातील मानसशास्त्राच्या प्राध्यापिका कॅथलिन गर्सन म्हणतात, एक असा देश जो स्वयंपूर्णतेसह आई होण्यावरदेखील भर देतो, तेथे महिलांसाठी कठीण परिस्थिती आहे. संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय आपण अयशस्वी आहोत आणि आपल्या मनासारखे वागू लागल्यास आपल्याला स्वार्थी म्हटले जाते.काही बोलके आकडे
0 33 टक्के अमेरिकन लोकांना वाटते की, मुले झाल्यास सामाजिक प्रतिष्ठा वाढते.

0 वयाच्या 40 ते 44 वर्षादरम्यानच्या 49 टक्के स्त्रिया स्वेच्छेने अपत्यहीन राहिलेल्या आहेत.

0 2017 मध्ये जगभरात मुलांसंबंधी उत्पादनांचा बाजार 62.3 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. 2011 मध्ये तो 41.3 अब्ज डॉलर होता.

0 अमेरिकेत मातांशी निगडीत व्यवसाय व्यवहार 24 अब्ज डॉलरचा आहे.