आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America News In Marathi, American Aid To Pakistan, Barack Obama

अमेरिकेचा हात आखडता, पाकच्या मदतीत केली18 टक्क्यांनी घट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेकडून पाकिस्तानला देण्यात येणा-या मदतीमध्ये 18 टक्क्यांनी घट करण्याचा प्रस्ताव राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मांडला आहे. आगामी वर्षात पाकिस्तानला सुमारे 80 कोटी 82 लाख डॉलर्सची मदत दिली जाणार आहे. ओबामा यांनी मांडलेला हा अर्थसंकल्पीय प्रस्ताव आता वरिष्ठ सभागृहाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे, असे काँग्रेसमधील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

आर्थिक पातळीवर सुमारे 50 कोटी 46 लाख डॉलर्सची, तर सुरक्षेच्या पातळीवर 30 कोटी 36 लाख डॉलर्सची मदत अमेरिका पाकिस्तानला पुरवणार आहे. 2013 मध्ये तुलनेने मदतीचा आकडा अधिक होता. आर्थिक पातळीवर सुमारे 80 कोटी 34 लाख डॉलर्स आणि 30 कोटी 61 लाख डॉलर्स सुरक्षेच्या पातळीवर मदत म्हणून देण्यात आले होते. मदतीची अंमलबजावणी करण्याचा कालावधी आॅक्टोबर 2014 मध्ये संपणार आहे. पाकिस्तानच्या सुरक्षेच्या निधीवर अमेरिकेने पूर्वी अधिक मदत देऊ केली होती; परंतु त्यात आता वाढ न करण्याचा निर्णय ओबामा यांनी घेतला आहे.