आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America News In Marathi, Scientific Research, Technology

तंत्रज्ञान परीक्षेत अमेरिकी नागरिक ढकलपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तसंस्था - अत्याधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक संशोधनाबद्दल जगभर तोरा मिरवणा-या अमेरिकेतील सामान्य नागरिकांचे विज्ञान, तंत्रज्ञानातील ज्ञान किती तोकडे आहे हे एका पाहणीत समोर आले आहे.अगदी नेहमीच्या, प्रचलित संज्ञांबद्दलही हे नागरिक अनभिज्ञ आहेत हे यातून दिसून आले. व्हाउचरक्लाउड डॉट नेट या कंपनीने हे सर्वेक्षण केले होते.


10 पैकी 1 अमेरिकनाला वाटते एचटीएमएल हा लैंगिक संसर्गजन्य आजार आहे. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (एचटीएमएल) ही संगणक प्रणालीची भाषा आहे, ज्यामुळे वेबपेजेसवर अक्षररूपी माहिती दिसू शकते. एचटीएमएलशिवायचा कंटेंट अधिकृत नसतो. देशातील 23 % लोकांना एमपी 3 ही संज्ञा स्टारवॉर रोबोट असल्याचेच वाटते. डिजिटल ऑडिओसाठी खास डिझाइन केलेल्या मुव्हिंग पिक्चर एक्स्पर्ट ग्रुपच्या प्रणालीला
एमपी 3 संज्ञा आहे.


संगणकाच्या विविध प्रोग्राम्सना सॉफ्टवेअर म्हणण्यात येते. सर्वेक्षणात सहभागीपैकी 15 % च्या मते सॉफ्टवेअर हा कॅज्युअल विअरचा प्रकार असल्याचे धक्कादायक उत्तर मिळाले. 12% च्या मते यूएसबी हे युरोपीय देशाचे लघुरूप नाव आहे. आपण डाटा ट्रान्सफरिंगसाठी यूएसबी अर्थात युनिव्हर्सल सीरियल बस केबल्सचा वापर दररोजच्या व्यवहारात करतो. 77 % उत्तरदात्यांना एसईओ (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन) संज्ञाच माहीत नव्हती.


औषधींसाठी ‘टॅब्लेट कॉम्प्युटर’
सहज हाताळता येणारा टॅब्लेट संगणक हा आजकालचा सर्वात लोकप्रिय प्रकार समजला जातो.पण अमेरिकी नागरिकांच्या दृष्टीने टॅब्लेट कॉम्प्युटर म्हणजे औपधी गोळ्यांसाठी वापरण्यात येणारे उपकरण. औषध-गोळ्या कधी घ्यायच्या याची आठवण हा क रुन देतो असे उत्तर दोन टक्के नागरिकांनी दिले आहे.