आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Not Fairly Investigate Myself Devyani Khobragade

अमेरिकेत आक्षेपार्हरीत्या माझी अंगझडती घेतली गेली - देवयानी खोब्रागडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी अमेरिकेत कपडे काढून अंगझडती घेतल्याला पहिल्यांदाच दुजोरा दिला आहे. याबरोबर त्यांना गंभीर गुन्ह्यातील आरोपींसोबत ठेवण्यात आले होते. मोलकरणीच्या खटल्यात मार्चनंतर कसलीच प्रगती झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवयानी म्हणाल्या, मी मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते तेव्हा बाहेर डिप्लोमेटिक सिक्युरिटी ब्युरोचे दोन कर्मचारी वाट पाहत होते. अनेकदा विनंती करूनही त्यांनी मला अटक वॉरंट दाखवले. मला अटक करता येऊ शकत नसल्याचे त्यांना सांगितले. मात्र, ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ते मला यूएस मार्शलच्या कार्यालयात घेऊन गेले. मोबाइल काढून घेण्याआधी मी पतीला व नणंदेला माहिती दिली.
वर्षभरानंतर खोब्रागडे यांनी मौन सोडले आहे. त्यांच्या मोलकरणीच्या वकिलाने धमकीचे तीन फोन केल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाचे खेटे मारण्यापेक्षा देण्या-घेण्यातून प्रकरण मिटवण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.मात्र, देवयानी यांनी त्याला कोणतीही भीक न घालता कार्यालयात येऊन बोलण्यास सांगितले. अमेरिकेत झालेल्या आरोपापेक्षा भारतात झालेल्या आरोपाने खूप वेदना झाल्या. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकेत व्हिसामध्ये गैरप्रकार व मोलकरणीला कमी वेतन दिल्याचे आरोप देवयानी यांच्यावर ठेवण्यात आले होते.
बेकायदा काम केले नाही. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात अमेरिकेत व्हिसामध्ये गैरप्रकार व मोलकरणीला कमी वेतन दिल्याचे आरोप देवयानी यांच्यावर ठेवण्यात आले होते. त्यांना अटकही करण्यात आली होती. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधावर परिणाम झाला होता.
देवयाणी गेल्यावर्षी न्यूयॉर्कमध्ये भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत होत्या. मोलकरीण संगीता रिचर्ड््स बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर अमेरिका प्रशासनाने कोणतीही मदत केली नाही. यानंतर संगीताचा फोन आला. तिने घराबाहेर राहण्याची परवानगी मागितली होती. मात्र, व्हिसातून तशी परवानगी नव्हती. तिला आमच्यासोबत राहावयाचे नाही हे तोपर्यंत आम्हाला
माहीत नव्हते.

आरोप आणि स्पष्टीकरण
आरोप : मोलकरीण संगीताचा छळ केला जात होता
खुलासा : आमच्या गैरहजेरीत मुलाची देखभाल करत होती. अशात मी िकंवा कुटुंबीय छळ कसा करू.