आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26/11 च्या गुन्हेगारांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या स्वाधीन करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉश्गिंटन - मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीबाबत पाकिस्तानकडून होत असलेली चालढकल पाहून अमेरिकेतून तीव्र नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. लष्कर- ए- तोयबाचा कमांडर झकीउर रहमान लखवीसह सातही आरोपींना निवाड्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या स्वाधीन करा, अशी मागणी अमेरिकेच्या एका ज्येष्ठ खासदाराने केली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सात संशयित आहेत. त्या सातही जणांना शिक्षा होणे आवश्यक आहे. पाकिस्तान त्यांच्यावर खटला चालवत नसेल, तर मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या स्वाधीन करा आणि निवाडा होऊ द्या, असे अमेरिकी काँग्रेसचे सदस्य एड रॉयस यांनी म्हटले आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांचे बळी गेले होते. पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयात 2009 पासून या सातजणांविरुद्ध खटला सुरू आहे. मात्र, तेव्हापासून या खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती पाचवेळा बदलण्यात आले आहेत.