वॉशिंग्टन - अमेरिकेच्या क्लीव्हलँडमध्ये पोलिसांनी एका 12 वर्षांच्या बालकाला गोळी मारल्याचे समोर आले आहे. या बालकाच्या हातातत खेळण्याचील बंदूक होते. ते खरे समजून पोलिस अधिका-यांनी त्याच्यावर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मैदानावर एक बालक हातात बंदूक घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्या बंदुकीने तो मुलगा लोकांना घाबरवत होता. त्यानंतर त्याठिकाणी पोहोचलेल्या पोलिस अधिका-यांनी मुलाला आधी चेतावणी दिली. त्याला हात वर करण्यास सांगितले. पण तो मुलगा काही केल्या ऐकत नव्हता. अखेर त्याने सरेंडर न केल्याने पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली.
एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी या मुलाचा मृत्यू झाल. गोळी चालवणारा अधिकारी वर्षभरापूर्वीत सेवेत दाखल झाला होता, अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, घटनास्थळी पोहोचलेल्या अधिका-यांनी संशयीताला शोधून त्याला हात वर करण्याचे संकेत दिले. त्याने पोलिसांचा आदेश धुडकावला आणि तो कमरेला लावलेली बंदूक काढू लागला. त्यावेळी इशारा देत नंतर अधिका-यांनी त्याच्यावर गोळी झाडली. या मुलाकडे 'एयरसॉफ्ट' सारखी नकली बंदूक होती आणि ती सेमी अॅटोमॅटिक पिस्तुलासारखी दिसत होती, असेही पोलिसांनी सांगितले.