आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत पाककृती स्पर्धेत भारतीय प्रथम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- भारताला एकापेक्षा एक खवय्ये आणि खानसाम्यांची परंपरा लाभली आहे. याच परंपरेचा वारसा पुढे नेणार्‍या भारतीय वंशाच्या 11 वर्षीय राजन डे याने थेट व्हाइट हाऊसमध्ये आपल्या हातच्या लज्जतदार पदार्थाचा ठसा उमटवला.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी अमेरिकेत झालेल्या एका स्पर्धेत विजयी 54 स्पर्धकांमध्ये राजनचा समावेश आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतील विजेत्यांना अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी खास मुलांसाठी आयोजित केलेल्या ‘स्टेट डिनर’चे खास आमंत्रण मिळाले आहे.

व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या या स्पर्धेत राजनने ‘यम्मी अँड हेल्दी कटी रोल’ हा पदार्थ बनवला. अमेरिकेतील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाढत्या स्थूलतेविरोधात मिशेल ओबामांनी ‘लेट्स मुव्ह’ ही विशेष मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून व्हाइट हाऊसमध्ये हेल्दी लंचटाइम चॅलेंज ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. आरोग्यदायी, कमी खर्चात, नैसर्गिक साहित्यापासून बनवलेला तसेच लज्जतदार पदार्थ तयार करण्याचे आव्हान या मुलांसमोर होते.