आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला नाही; ब्रिटनच्या संशोधकांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेरिकेचा शोध ख्रिस्तोफर कोलंबसने लावला ही माहिती सर्वांना आहे. परंतु ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे अमेरिकन जमिनीवर पहिले पाऊल कोलंबसनेच ठेवल्याच्या दाव्याला छेद बसला आहे. कोलंबसच्याही जवळपास 2000 वष्रे आधी फोनेसिया संस्कृतीचे लोक अमेरिकेत पोहोचले होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

आतापर्यंत असे म्हटले जात होते की, कोलंबसने 1492 मध्ये नौकेने प्रवास करून ‘जुन्य जगा’तून ‘नव्या जगात’ पाऊल ठेवले होते. त्याआधी कॅरेबियन सरकार किंवा लोकांना मधल्या जलक्षेत्राची माहितीच नव्हती. सीनएनएनने दिलेल्या माहिती ब्रिटनच्या नौदलाचे माजी अधिकारी व संशोधक फिलिप बेल कार यांचे म्हणणे असे की,1500 व 300 इसवीसन पूर्व काळात यहुदी संस्कृतीचे फोनिसिया लोक नौकेद्वारे पहिल्यांदा अमेरिकेत पोहोचले होते. मानवी इतिहासातील तो सर्वात मोठा जलप्रवास होता, असेही बेल यांनी म्हटले आहे.