आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Say No Comments On Delhi Election Results

दिल्ली निवडणुकीवर अमेरिकेचे 'नो कॉमेंट्स'! ओबामांच्या दौ-यानंतर संबंधाला बळकटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अरविंद केजरीवाल
वॉशिंग्टन - दिल्ली विधानसभेतील आम आदमी पार्टीच्या दिमाखदार विजयावर प्रतिक्रिया देण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-यानंतर दोन्ही देशांतील संबंधांना बळकटी आल्याचे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी सांगितले.
ती (दिल्ली) निवडणूक भारत सरकार आणि भारतीयांची बाब असल्याचे पास्की म्हणाल्या. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ने ७० पैकी ६७ जागा जिंकल्याबद्दल त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. राष्ट्राध्यक्षांचा दौरा, द्विपक्षीय संबंध आणि भागीदारीचा विचार केल्यास भारतासोबतचे संबंध वृद्धिंगत होत आहेत. या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दौरा केल्याने भारताची क्षमता अधोरेखित होते. निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रिया देणार नसल्याचे पास्की यांनी सांगितले.

पुढे वाचा केजरीवाल यांच्या विजयाबद्दल पास्की काय म्हणाल्या