आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामांना विषारी पत्र, टेक्सासमधील अभिनेत्री जेरबंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना विषारी औषध लावलेले पत्र पाठवल्या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्हेस्टिगेशनने (एफबीआय) एकेकाळी अभिनेत्री असलेली टेक्सासची शॅनन रिचर्डसन (35) हिला ताब्यात घेतले आहे.

शॅनन गेस आणि शॅनन रोजर्स या नावांनीही परिचीत असलेल्या या महिलेने राष्ट्राध्यक्ष ओबामा आणि न्यूयॉर्कचे महापौर मायकल ब्लूमबर्ग यांना रिसीन हे विषारी औषध लावलेले पत्र पाठवले होते. शॅननला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.