इंटरनॅशनल डेस्क - तीन जुलै 1988 रोजी सकाळी नऊ वाजले होते, जेव्हा पर्शियन खाडीत अमेरिकन नौसेनेची युध्दनौका गस्त घालत असताना इराणच्या प्रवाशी विमानावर हल्ला केला. दरम्यान इराण-इराक युध्द शेवटच्या टप्प्यात होते आणि अमेरिकेच्या नौसेनेला वाटले की एक एफ-14 लढाऊ विमान होते. याच भीतीमुळे अमेरिकेने इराणच्या विमानावर हल्ला केला. अमेरिकेच्या युध्दनौकेला रडारवरून विमानाची माहिती मिळाली होती. पायलटला विमानाची दिशा बदलण्याचा इशारा दिला. पण त्यावर कोणातीही कृती घेण्यात न आल्याने युध्दनौकेने विमानाला मिसाइलने आकाशातच उडवण्यात आले.
290 लोकांनी गमावला जीव
इराणच्या या विमानात 290 प्रवाशी होते. त्यात इराणबरोबरच भारत, पाकिस्तान, युगोस्लाव्हिया, इटली आणि युएई या देशांचे प्रवाशी होते. अमेरिकेच्या मिसाइल हल्ल्यात विमानातील सर्व प्रवाशी मृत्यूमुखी पडले. अमेरिकेची क्रूरता अशी प्रतिक्रिया इराण दिली होती.
अमेरिकेने व्यक्त केले होते दु:ख
अमेरिकेच्या तत्कालिन राष्ट्रपती रोनाल्ड रेगनने विमान हल्ल्यास एक दुर्घटना असे म्हटले होते आणि प्रवाशांच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केले. आकार, उड्डाण क्षमता आणि रचनेमुळे विमान एफ-14 प्रवाशी एअरबसपेक्षा वेगळे दिसत असताना हल्ला कसा करण्यात आला, असा प्रश्न जगभर विचारण्यात आला.
अमेरिकेने दिला मोबदला
फेब्रुवारी 1996 मध्ये अमेरिका या हल्लेचा मोबदला देण्यास राजी झाली. अमेरिकेने इराणला 6.1 कोटी डॉलर (जवळ-जवळ 3.6 अब्ज रूपये) रूपये मोबदला म्हणून दिले. याबरोबरच एअरक्राफ्ट आणि न्याययिक प्रक्रियेसाठीही पैसे दिले. ज्या देशाचे नागरिक हल्लेत मारले गेले होते त्यांना 4 कोटी डॉलर ( 2. 3 अरब रूपये ) रूपयांचा मोबदला देण्यात आला.
पुढील स्लाइड्सवर पाहा इराणच्या विमानावरील हल्ल्याची छायाचित्रे आणि त्यानंतरची छायाचित्रे....