आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Social Networking Sites Agitation For Piracy

अमेरिकेच्या सरकारी वेबसाइटवर हॅकर्सचा हल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेत पायरसी विरोधात सोशल नेटवर्किंग साइटने ऑनलाइनचे आंदोलन सुरू केले आहे. या वातावरणाचा फायदा घेत शुक्रवारी अमेरिकेत हॅकर्सनी सरकारी तसेच कॉपीराइट संघटनांच्या वेबसाइट हॅक केल्याने एकच गोंधळ निर्माण झाला आहे. हॅकर्सच्या या हल्ल्याने अमेरिकन थिंक टँक हादरले आहे.
शुक्रवारी मेगाअपलोड या वेबसाइटने शटडाऊन केले होते. याच काळात अचानक लिंकमध्ये अडथळा आल्याचे दिसून आले. त्यानंतर अमेरिकेतील महत्वाच्या सरकारी वेबसाइट हॅक झाल्याचे आढळून आले. शट डाऊनचा फायदा घेत हॅकर्सनी हा हल्लाबोल केल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या न्याय विभागाची वेबसाइट, एफबीआय व मोशन पिक्चर्स असोसिएशन ऑफ अमेरिका यांना फटका बसला. मेगाअपलोड ही फाइल-शेअरिंग वेबसाइट आहे. या वेबसाइटने ब्लॅकआऊट केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे न्याय विभागाच्या वतीने गुरुवारी जाहीर करण्यात आले. पायरसी नियमांचा भंग केल्याप्रकरणी या वेबसाइटचे मालक व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे संकेतही विभागाने दिले आहेत. या कंपनीच्या चार कर्मचाºयांना ऑकलंड, न्यूझीलंड येथे अटक करण्यात आल्याचेही वृत्त आहे. एफबीआयची वेबसाइट गुरुवारी 45 मिनिटे अ‍ॅक्सेस दाखवत होती. परंतु त्यानंतर एरर मेसेज येत होता : ‘गेट सम पॉपकॉर्न ’ असे त्यात म्हटले होते. लल्झ सेक असे या हॅकर्सचे नाव सांगण्यात आले.
एफबीआय, संगीत क्षेत्रातील एकूण दहा वेबसाइट ऑफलाइन केल्या आहेत, असे हॅकर्सनी पाठवलेल्या संदेशात म्हटले होते. हॅकर्सनी 200 गीगाबाइट्स डाटा चोरल्याचा दावा केला आहे.

5 , 635
एवढ्या वेबसाइट्स ब्लॅकआऊटच्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. हे आंदोलन सरकारच्या पायरसी विधेयकाविरोधात आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाची वेबसाइट हॅक
पाक राष्ट्रपती झरदारींच्या प्रवक्त्याचे मेल अकाउंट हॅक
ऐन पर्यटन हंगामातच मराठी वेबसाइट बंद