आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका करते आपल्याच नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांचीही हेरगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या अमेरिकेने आपल्या नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांचीही हेरगिरी सुरू केली आहे. जगभरात ऑनलाइन हेरगिरीचा भंडाफोड झाल्यानंतर हा अमेरिकेचा हा आणखी एक चेहरा समोर आला आहे. लाखो अमेरिकी नागरिकांना परदेशात पाठवलेले पैसे आणि परदेशातून देशात पैशांवर गुप्तचर संस्था सीआयएची निगराणी सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षा संस्था (एनएसए)ने ज्या कायद्यांतर्गत ही हेरगिरी केली त्याच कायद्याचा वापर करून सीआयएनेही हे उद्योग केले आहेत.
सीआयए मुख्यत: परदेशात हेरगिरी करते. मात्र पॅट्रिऑटिक कायद्याचा वापर करून सीआयए हेरगिरी करीत असल्याचा गौप्यस्फोट ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केला आहे. आर्थिक हेरगिरीत देशांतर्गत व्यवहारावर निगराणी ठेवण्यात आलेली नाही. परंतु पैशांच्या व्यवहाराच्या हेरगिरीचे अधिकृतपणे मान्य करण्यात आलेले नाही. कायद्यानुसार सीआयए देशांतर्गत कारवायांवर निगराणी करीत नाही, असे सीआयएचे प्रवक्ते डीन बॉयड यांनी सांगितले. सीआयए मोठ्या प्रमाणावर परदेशी व्यवहारांचा तपशील गोळा करीत असल्याचे सांगितले जाते. दहशतवाद्यांना कुणी आर्थिक मदत करतोय का अथवा बाहेरचे दहशतवादी कुणा अमेरिकी नागरिकांना पैसा पुरवतोय का, याची देखरेख करण्यासाठी ही हेरगिरी सुुरू आहे.
स्नोडेनने 2 लाख दस्तऐवज चोरले
सीआयएचा एकेकाळचा कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने दोन लाखांपेक्षांही अधिक गोपनीय दस्तऐवज चोरून प्रसारमाध्यमांकडे दिले असावेत असा अंदाज असून एनएसएनेही ते मान्य केले आहे. बाल्टिमोर येथे एका प्रश्नाच्या उत्तरात एनएसएचे प्रमुख जनरल किथ अलेक्झांडर यांनी ही माहिती दिली.तेच आकडे व फाइल्समधील माहिती प्रसारमाध्यमांत येत आहे, असे ते म्हणाले.
स्नोडेन याने ही गोपनीय माहिती हस्तगत करून अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या बेकायदा व जनहितविरोधी कारवाया चव्हाट्यावर आणल्या आहेत. आपल्या नागरिकांबरोबरच जगभरातील बड्या नेत्यांचे फोन कॉल्स,मेसेज व ई-मेल्सवरही अमेरिकेची नजर आहे हे स्पष्ट झाले.
गुप्तचरांचे बेकायदा उद्योग
अमेरिकी गुप्तचर तथा निरीक्षक 17 देशांमध्ये विविध कारवायांमध्ये सामील असल्याचे उघड झाले आहे. गुप्तचर सेवेकडून सिनेटच्या समितीला पाठवण्यात आलेल्या अहवालातच ही बाब समोर आली आहे. या गुप्तचरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे, असे रिपब्लिकन सिनेटर रोनाल्ड जॉन्सन यांनी सांगितले.