आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Starts Air Attack On ISIS Camp, Divya Marathi

धमक्यांना भीक न घालता अमेरिकेचे \'इस्लामिक स्टेट\'च्या तळांवर हवाई हल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - इस्लामिक स्टेट (आयएस) या क्रूर दहशतवादी संघटनेच्या धमक्यांना भीक न घालता अमेरिकेने इराकी हद्दीत आयएसच्या तळांवर जोरदार हवाई हल्ले सुरू केले आहेत. राजधानी बगदादजवळ मंगळवारी हे हल्ले करण्यात आले.

गेल्या गुरुवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आयएसचा नायनाट करण्याचे अमेरिकेचे ध्येय असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कारवाईचे नवे धोरण निश्चित करण्यात आले. या धोरणानुसार पहिला हल्ला करण्यात आला. या लढाईत अमेरिकेला १० अरब राष्ट्रांसह जगभरातील ४० देशांनी पाठिंबा दिला आहे.अमेरिकी संरक्षण दलाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राजधानी बगदादजवळ अमेरिकी विमानांनी हे हल्ले केले. मात्र, आपली ही कारवाई आयएसविरुद्ध लढणाऱ्या इराकी फौजांच्या मदतीसाठी असल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. या हल्ल्यांमध्ये आयएसच्या दहशतवाद्यांचे नेमके नुकसान काय झाले ही माहिती बाहेर आली नसली तरी अगदी अचूक माहितीच्या आधारे आयएसच्या तळांवर हल्ले करण्यात येत असल्याचे इराकी वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

अमेरिकेने इराकला मदत म्हणून इराकच्या बाह्य भागांत आयएसवर हवाई हल्ले सुरू केल्यानंतर या दहशतवाद्यांनी ओलिस ठेवलेले दोन अमेरिकी पत्रकार व एका अमेरिकेला साथ देणाऱ्या ब्रिटनच्या एका नागरिकाचा शिरच्छेद केल्याचे व्हििडओ चित्रण जाहीर केले होते. हल्ले थांबवले नाहीत तर आणखी नागिरकांचा असाच शिरच्छेद केला जाईल, अशी धमकी आयएसने दिली होती. मात्र, या धमक्यांना न जुमानता अमेरिकेने मंगळवारी दहशतवाद्यांविरद्ध कारवाई सुरू केली.

* इराकी हद्दीत जोरदार कारवाई, रणनीतीनंतरची धडाकेबाज कृती

कारवाई नव्या धोरणानुसारच
अमेरिकेने इराकमध्ये कारवाई करताना केवळ हवाई हल्ले करण्यात येतील, असे जाहीर केले होते. याशिवाय इराकी फौजांच्या मदतीसाठी संरक्षणविषयक सल्लागार इराकमध्ये पाठवण्याची घोषणा ओबामा यांनी केली होती. या धोरणानुसारच जोरदार हल्ले सुरू करण्यात आले आहेत.

व्याप्ती वाढवली
वास्तविक अमेरिकेने गेल्या महनि्यातच आयएसविरुद्ध उत्तर इराकमध्ये हवाई हल्ले सुरू केले होते. मात्र, आता याची व्याप्ती वाढवून राजधानीजवळ हे हल्ले सुरू करण्यात आले. यापूर्वी करण्यात आलेल्या हल्ल्यांच्या तुलनेत बगदादजवळ करण्यात आलेले हल्ले अिधक क्षमतेचे होते.

पाकिस्तानात ३१ ठार
पाकिस्तानात दोन वेगवेगळ्या हिंसक घटनांमध्ये ३१ दहशतवादी आणि तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. पाकच्या ईशान्येकडील आदिवासी भागात तालिबानविरोधात पाक लष्कराने मोठी मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी खैबर येथे पाकिस्तानी लढाऊ विमानांच्या हल्ल्यात २० दहशतवादी मारले गेले. अन्य एका घटनेत अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या एका समूहाने उत्तर वझिरिस्तानातील दंडी कुच या पाकिस्तानी तळावर हल्ला केला.